32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरराजकारणभाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यावर मिळविला अवघ्या १६ मतांनी विजय

भाजपच्या उमेदवाराने काँग्रेसच्या प्रतिस्पर्ध्यावर मिळविला अवघ्या १६ मतांनी विजय

Google News Follow

Related

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बेंगळुरूतील जयनगर मतदारसंघात भाजपचे सी. के. राममूर्ती यांनी काँग्रेसच्या उमेदवाराचा अवघ्या १६ मतांनी पराभव केला. येथून काँग्रेसच्या सौम्या रेड्डी उभ्या होत्या. मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांनंतर हा निकाल जाहीर करण्यात आला.

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, काँग्रेसच्या सौम्या रेड्डी यांना ५७ हजार ७८१ (४७.८५ मतटक्का) मते मिळाली तर, सी. के. राममूर्ती यांना ५७ हजार ७९७ मते मिळाली. मतमोजणीदरम्यान सौम्या रेड्डी या राममूर्ती यांच्यापेक्षा अवघ्या काही मतांनी पुढे होत्या, त्यामुळे भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये शनिवारी रात्रीपर्यंत तणावाचे वातावरण होते.

मतमोजणीच्या फेऱ्या झाल्यानंतर रेड्डी यांना राममूर्ती यांच्यापेक्षा २९४ मते अधिक मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे काँग्रेसने विजयोत्सव करण्यास सुरुवात केली. मात्र भाजपने पुन्हा मतमोजणीची मागणी केली. निवडणूक आयोगाने ती मान्य केली. यावेळी सौम्या रेड्डी यांचा निकाल फिरवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग करत आहे, असा आरोप कर्नाटक काँग्रेसचे प्रमुख डी. के. शिवकुमार यांनी केला. सौम्या रेड्डी या कर्नाटक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष रामलिंगा रेड्डी यांच्या कन्या आहेत.

आधी लागलेला निकाल, नंतर मतमोजणीची मागणी आणि निवडणूक आयोगाने त्याला दिलेला होकार यामुळे जयनगर येथील आर. व्ही. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर आंदोलनाला सुरुवात करून न्याय देण्याची मागणी केली. राममूर्ती यांच्या विजयासाठी सरकारी यंत्रणेचा वापर केला जात असल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.

हे ही वाचा:

कर्नाटकमध्ये काँग्रेसला पूर्ण बहुमत; भाजपाची हार, जनता दलानेही गमावला विश्वास

अकोल्यात दोन गट एकमेकांना भिडले; एकाचा मृत्यू

बनावट नोटा प्रकरणी एनआयएकडून मुंबईत एकाला अटक; शस्त्रसाठा जप्त

उत्तरप्रदेशात सगळे महापौर भाजपाचे तर ९९ नगराध्यक्ष

परिस्थिती बिघडू नये, यासाठी बेंगळुरू पोलिस आणि राखीव दलाच्या तुकड्या मतमोजमी केंद्राच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर तैनात करण्यात आल्या होत्या. अखेर काही तासांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर भाजपचे सी. के. राममूर्ती यांना अवघ्या १६ मतांनी विजयी घोषित करण्यात आले. भाजपच्या या विजयामुळे २२४ मतदारसंघाच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेसला १३५ जागा मिळाल्या असून भाजपला ६६ जागांवर समाधान मानावे लागले आहे. या प्रकरणी डी. के. शिवकुमार यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्याचे समजते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा