33 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरराजकारण'भाजप-शिंदे युती स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणेही निवडणुका लढवणार'

‘भाजप-शिंदे युती स्वतंत्रपणे आणि संयुक्तपणेही निवडणुका लढवणार’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वक्तव्य

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना गट काही नागरी निवडणुका स्वतंत्रपणे तर काही युतीत लढतील, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. आपण मूळ शिवसेना पक्षाचे प्रतिनिधीत्व करत असल्याचा दावा करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रातीलराज्यातील नागरी संस्थांच्या आगामी निवडणुका एकत्र लढतील असे विधान ऑगस्टमध्ये केले होते.

शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर ३० जून रोजी महाराष्ट्रात शिंदे-भाजप युतीची सत्ता आली.राज्यात मुंबई महापालिका आणि राज्यातील निवडणुका कशा प्रकारे लढणार याबद्दल जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या संदर्भात पत्रकारांनी छेडले असता उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या नेतृत्वाखालील भाजप आणि शिवसेना गट काही नागरी निवडणुका स्वतंत्रपणे लढवतील, तर इतर नागरी निवडणुकांमध्ये युती असेल. आम्ही ते नक्कीच करू. नागरी निवडणुकांचे वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर केले जाईल केले जाईल असेही ते म्हणाले.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येत्या जानेवारीत महापालिका निवडणुका होणार असल्याच सुचक विधान केलं आहे.दिवाळी निमित्त वर्ष निवासस्थानी पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना त्यांनी ही माहिती दिली. महापालिका निवडणुका डिसेंबरमध्ये होतील असं सांगितलं जात होतं. मुख्यमंत्र्यांनीही जानेवारीत निवडणुका होणार असल्याचं सांगितल्याने आता निवडणुकांची चर्चा आणखी रंगली आहे.

हे ही वाचा:

बॉल समजून मुलं बॉम्बशी खेळत होती.. जीवावर बेतले

गुगलला पुन्हा एकदा दणका

नामा म्हणे देवा भक्तजनवत्सला । क्षण जीवावेगळा न करी मज

मुहूर्ताच्या सौद्यांत गुंतवणुकदारांनी साजरी केली नफ्याची दिवाळी

 

मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच
मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल शिंदे यांना छेडले असता त्यांनी सांगितले की मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार आहे. राज्यमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे मंत्र्यांवरचा कामाचा टॅन हलका होईल असेही ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,974अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा