29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरराजकारण‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’

‘राज्यसभा निवडणुकीत भाजपाचा तिसरा उमेदवार जिंकणारच’

Google News Follow

Related

राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेलं असताना केंद्रीय नेते अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भाजपच्या नेत्यांची निवडणुकींच्या रणनीतीची बैठक आज, ५ जून रोजी पार पडली. या बैठकीनंतर भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांशी बोलताना राज्यसभा निवडणुकीत आमचा तिसरा उमेदवार जिंकणारच, असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेनेला आपला पराभव दिसत असल्याने त्याची कारणमिमांसा करण्याआधीच ते उत्तर पेरत आहेत. अपक्ष आमदारांवर केंद्रीय यंत्रणांच्या मार्फत दबाव आणण्यात येतो आहे, हे संजय राऊत यांचं विधान बालिश असल्याचे म्हणत आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

भाजपचे काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर आशिष शेलार यांनी म्हटलं की, कोल्हापूरचे काँग्रेसचे काही आमदार सतेज पाटलांनी सांभाळले तर बरं होईल. दुसऱ्यावर दोष देण्याऐवजी स्वतःच्या आमदारांनाच त्यांना नजरकैदेत ठेवावं लागतंय. आमदारांना कैदेत ठेवण्याचं पाप महाविकास आघाडी करत असून लोकशाहीवरही बोलत आहे,” असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. जे तबेल्यात राहतात त्यांना घोडेबाजार दिसतो. शिवनेसेच्या नेत्यांनी तबेल्यात झोपणं सोडून द्यावं मग त्यांना अशी स्वप्न पडणार नाहीत, अशी सणसणीत टीका आशिष शेलार यांनी शिवसेनेवर केली.

हे ही वाचा:

पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉलचे लक्ष्य मुदतीआधीच गाठले

देवेंद्र फडणवीसांना पुन्हा कोरोनाची लागण

अमेरिकेत पुन्हा गोळीबार, तिघांचा मृत्यू

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

आजच्या बैठकीत केंद्रीय निरिक्षक आणि रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेचे उमेदवार पीयूष गोयल उपस्थित होते. तसेच कोरोनाची लागण झाली असली तरी या बैठकीत देवेंद्र फडणवीस ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शक केलं. चंद्रकांत पाटील आणि सर्व प्रमुख नेते उपस्थित होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा