28 C
Mumbai
Monday, June 27, 2022
घरविशेषदेवेंद्र फडणवीसांना पुन्हा कोरोनाची लागण

देवेंद्र फडणवीसांना पुन्हा कोरोनाची लागण

Related

देशभरात कोरोना रुग्ण वाढत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ट्विट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. कोरोनाची लागण झाली असून गृहविलगीकरणात असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये महटले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. याआधीही देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली होती.

बॉलीवूड कलाकारही कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. कार्तिक आर्यन, शाहरुख खान, कॅटरीना कैफ, यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तसेच काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्या वाढदिवसाची पार्टी यशराज फिल्म्स स्टुडीओत रंगली होती. मात्र, ही पार्टी आता सुपर स्प्रेडर ठरली आहे. या पार्टीत सहभागी झालेल्या काही कलाकारांसह ५० ते ५५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे ही वाचा:

बांगलादेशमध्ये कंटेनर डेपोला लागलेल्या आगीत ४० जणांचा मृत्यू

“नोंद नसलेल्या श्रीजी होम्समध्ये उद्धव ठाकरेंची ८९ टक्के भागीदारी”

“काश्मिरी पंडितांची चिंता करणाऱ्यांच्या राज्यातल्या हिंदूंचं काय?”

…म्हणून बायडेन यांना सुरक्षित स्थळी हलवले

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णसंख्येत देशात केरळनंतर महाराष्ट्राचा क्रमांक येतो. सध्या परिस्थिती चिंताजनक नसली तरी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्कचा आवर्जून वापर करा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,937चाहतेआवड दर्शवा
1,922अनुयायीअनुकरण करा
11,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा