25 C
Mumbai
Tuesday, March 21, 2023
घरराजकारणमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला काय उत्तर देणार ह्याकडे लक्ष

Google News Follow

Related

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे , उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता मुख्यमंत्री काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. माजी आमदार रामदास कदम यांनी या सभेचे आयोजन केले असून संध्याकाळी सहा वाजता हि सभा आयोजित करण्यात आली आहे. खेडमधल्या या सभेत मुख्यमंत्री या सभेत काय बोलणार तिकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. काही दिवसांपूर्वी खेड मधल्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती आता तिथेच हि सभा होणार असून , याच सभेत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या मैदानावर झालेल्या सभेत उद्धव ठाकरेंनी ४० आमदार पळून गेले त्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर रामदास कदम आणि इतर शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरे त्या सभेत काय बोलले?
उद्धव ठाकरे यांनी ज्यांना जे शक्य होते ते दिले पण आता ते खोक्यात बंद झाले आहेत, अशी जहरी टीका केली होती. आता मी तुम्हाला काही देऊ शकत नाही कारण माझे हात आता रिकामे झाले आहेत. आज मी तुमच्याकडे काहीतरी मागायला आलो आहे जे भुरटे चोर आहेत , गद्दार आहेत त्यांना मला सांगायचे आहे कि तुम्ही जरी शिवसेना हे नाव चोरू शकलात पण आमची शिवसेना चोरू नाही शकणार. रावण जिथे आपटला तिथे या मिंधे गटाचे काय होणार असा त्यांनी खोचक टोला लगावत शिंदे गटाला म्हंटले आहे. मला फक्त तुमची सोबत हवी आहे. अशी मागणी त्यांनी खेडवासीयांना केली. मी घरात राहून जो महाराष्ट्र सांभाळला तो तुम्ही घराघरांत आणि गुवाहाटीला जाऊन पण सांभाळू शकत नाहीत दिल्लीत मुजरे मागायला जाण्यामध्ये तुमचे अर्धे आयुष्य जात आहे.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

मंत्रीपदे ज्यांना दिलेली नाही आहेत त्यांना सांभाळताना उरलेले सुद्धा जात आहे. गुजरातला सगळे उद्योग जात आहेत. कारण आता निवडणूक गुजरातला होत आहेत. अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आता ज्यांनि बाळासाहेबांचे विचार कधी ऐकलेही नाहीत त्यांना काही कळत नाही ते आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार का? काय होते बाळासाहेबांचे विचार? नोकऱ्या जाऊ द्या हे विचार नव्हते बाळासाहेबांचे , भूमिपुत्रांच्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या शिवसेनेचा विजय असो हा फक्त घेऊन झाली होती. असेही ठाकरे म्हणाले. दरम्यान आज संध्याकाळी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय संबोधित करणार या कडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,884चाहतेआवड दर्शवा
2,019अनुयायीअनुकरण करा
65,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा