35 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरदेश दुनियाराहुल गांधींनंतर आता पाक राष्ट्राध्यक्ष शरीफना RSSची ऍलर्जी

राहुल गांधींनंतर आता पाक राष्ट्राध्यक्ष शरीफना RSSची ऍलर्जी

शाहबाज शरीफ यांनी इम्रान खान यांचा संबंध जोडला आरएसएसशी

Google News Follow

Related

भारतातील काँग्रेसचे नेते राहुल गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल वाट्टेल ते बोलत असतात आता त्यांच्या साथीला आहेत ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शाहबाज शरीफ. इम्रान खान यांच्यावरील कारवाईच्या दरम्यान आता शरीफ यांनी इम्रानचा संबंध थेट आरएसएसशी जोडला आहे.

सध्या पाकिस्तानातील तहरिक ए इन्साफ या संघटनेचे प्रमुख इम्रान खान यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी गरळ ओकली आहे. त्यांनी थेट इम्रान खान यांच्यावर टीका करताना आरएसएसशी त्यांचा संबंध जोडला आहे. सध्या इम्रान खान यांना इस्लामाबादमधील न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत पण ते उपस्थित राहात नसल्यामुळे त्यांच्या अटकेची तयारी करण्यात येत आहे. पण त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अटकेला विरोध करत पोलिसांवरच हल्ला केला. त्यातच शरीफ यांनी आरएसएस आणि इम्रान यांचा संबंध जोडला. ते म्हणतात की, इम्रान खान यांच्या फॅसिस्ट आणि अतिरेकी वृत्तीचा पर्दाफाश झाला आहे. मानवी ढालीच्या रूपात लोकांचा वापर करण्याबरोबरच पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयासही इम्रान यांचा पक्ष करत आहे. इम्रान खान कदाचित आरएसएसच्या पुस्तकातून काही शिकले असावेत.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

पोलिसांनी इम्रानच्या घरात प्रवेश करण्यासाठी बुलडोझरला वापर करत त्यांच्या घराचे मुख्य प्रवेशद्वार उडवून लावले. तोशाखान प्रकरणात अनेकवेळा इम्रान खान यांना न्यायालयाने हजर राहण्याची नोटीस बजावली पण ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे अखेर त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जाहीर झाले. १८ मार्चला त्यांना न्यायालयात हजर राहायचे होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा