25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरक्राईमनामालालबाग हत्याकांडात मार्बल कटरने मृतदेहाचे केले होते तुकडे, रिंपलची कबुली

लालबाग हत्याकांडात मार्बल कटरने मृतदेहाचे केले होते तुकडे, रिंपलची कबुली

पोलिसांना चौकशीत अनेक नव्या गोष्टी सापडल्या

Google News Follow

Related

लालबाग हत्याकांड प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. आईच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर रिम्पलने ते तुकडे जाळण्याचा दोन वेळा प्रयत्न केला,मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आले होते, अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली आहे. तसेच रिम्पलने आईचा मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी दोन मार्बल कटरचा वापर केल्याचे समोर आले असून पोलिसांनी दोन्ही कटर घटनास्थळावरून जप्त केले आहे.

लालबागच्या इब्राहिम कासम चाळीतील पहिल्या मजल्यावरील एका खोलीत १४ मार्च रोजी वीणा जैन (५५) या महिलेच्या मृतदेहाचे तुकडे कुजलेल्या अवस्थेत काळाचौकी पोलिसांना आढळले होते. याप्रकरणी पोलिसांनी वीणा जैन हिची मुलगी रिम्पल (२४) हिला अटक केली. वीणा जैन हिचा मृत्यू तीन महिन्यांपूर्वी म्हणजे २७ डिसेंबर रोजी झाला होता व तिच्या मृतदेहाचे तुकडे करून कपाटात आणि पिंपात रिम्पल हिने लपवून ठेवले होते. आईच्या मृत अवयवसोबत ती मागील तीन महिन्यापासून राहत होती.

पोलिसांनी घटनास्थळावरून अनेक वस्तू ताब्यात घेतल्या होत्या,त्यात मार्बल कटर, कोयता,सुरा, ऍसिड, फिनाईलची बॉटल, रूम फ्रेशनर या वस्तू हस्तगत करण्यात आल्या होत्या. रिम्पल हा गुन्हा एकटी करू शकत नाही, असे सर्वांना वाटत होते, पोलिसांना देखील तिने एकटीने एवढं सर्व केले याच्यावर विश्वास बसत नव्हता, परंतु तिच्या चौकशीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अजूनही ती आईची हत्या मी केली नसल्याचे सांगत आहे, आई बाथरूमला जाताना २७ डिसेंबर रोजी पहाटे पहिल्या मजल्यावरून खाली पडली होती. तळमजल्यावर असणाऱ्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या दोन मुलांनी आईला घरी आणण्यास मदत केली होती.

घरात आणल्यानंतर काही वेळ आई जिवंत होती, मात्र नंतर तिचा मृत्यु झाला. आईच्या मृत्यूला सर्व जण आपल्याला जबाबदार ठरवतील म्हणून घाबरून मी गोष्ट कुणालाही न सांगता मृतदेहाची विल्हेवाट लावायचे ठरवले. त्यासाठी तिने इंटरनेटवरून काही माहिती मिळवली व दुकानातून मार्बल कापण्याचा कटर, कोयता इत्यादी वस्तू त्याच दिवशी घरी आणून ठेवल्या होत्या.  त्याच दिवशी आईचा मृतदेहाचे तुकडे करण्यास सुरुवात केली, परंतु आणलेल्या कटरचे ब्लेडने मृतदेह कापला जात नसल्यामुळे ३० डिसेंबर रोजी दुसरे कटर विकत आणून मृतदेहाचे पाच तुकडे केले व घरातील मोरीत आणून ते जाळण्याचा प्रयत्न केला, ते जळत नसल्याचे बघू दुकानातून आणलेले ऍसिड टाकून नष्ट करण्याचा प्रयत्न देखील रिम्पलने केला. परंतु त्यात ती अपयशी झाली, अखेर तिने ते मृतदेहाचे तुकडे प्लास्टिक बॅगेत भरून कपाटात आणि पिंपात ठेवून दिले होते, अशी धक्कादायक माहिती चौकशीत समोर आली असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

हे ही वाचा:

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

 

रिम्पलने जे काही पोलिसांना सांगितले त्याची खात्री करण्यासाठी पोलिसांनी पुन्हा एकदा घराची झडती घेतली, असता पोलिसांना अर्धवट जळालेली मॅक्सी आणि आणखी एक मार्बल कापण्याचे कटर मिळून आले. तसेच तिने ज्या दुकानातून या वस्तू विकत घेतल्या त्या दुकानात रिम्पलला शनिवारी घेऊन जाण्यात आले आणि खात्री करण्यात आली आहे. या सर्व प्रकरणात हॉटेल मध्ये काम करणाऱ्या दोन कर्मचारी यांची भूमिका केवळ वीणा ज्या वेळी खाली पडल्या त्या वेळी त्यांना खोलीत घेऊन जाण्यास त्यांनी रिम्पलला मदत केली होती, अशी माहिती समोर येत आहे.

 

तसेच रिम्पल ही नातेवाईक व्यतिरिक्त पाच जणांच्या संपर्कात होती, त्यापैकी हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करणारा तरुण, हॉटेल मधील कर्मचारी, सँडविच वाला बॉबी आणि मेडिकल मध्ये काम करणारी व्यक्ती यापैकी सँडविच वाला बॉबीसोबत तिचा सर्वात जास्त संपर्क होत होता. पोलिसांनी या सर्वाचे जबाब नोंदवून घेतले आहेत. ७ जानेवारी रोजी बॉबी गावी निघून गेल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर अधिक संशय होता व त्याच्या संपर्कात रिम्पल सतत असल्यामुळे त्याने तिला या गुन्हयात मदत केली असावी अशी शक्यता असल्यामुळे पोलिसांनी उत्तरप्रदेश लखनौ येथून शुक्रवारी बॉबिला मुंबईत आणले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे.

 

काळाचौकी पोलिसांच्या चार दिवसाच्या तपासात या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले तसेच चौकशी करण्यात आलेल्याची भूमिका अद्याप दिसून येत नाही. आतापर्यत केलेल्या तपासात या गुन्हयात रिम्पल हीचा एकटीचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा