32 C
Mumbai
Friday, November 18, 2022
घरक्राईमनामाधक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट

धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचा कट

Google News Follow

Related

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची धक्कादायक माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. आत्मघाती स्फोट घडवून शिंदेंना जीवे मारण्याचा कट रचला असल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या असून मुख्यमंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्याच्या सूचना मुंबई पोलिसांनी दिल्या आहेत.

महिनाभरापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याचे पत्र मंत्रालयात त्यांच्या कार्यालयात आले होते. त्यानंतर धमकीचा एक निनावी फोन देखील आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आधीच माओवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती.

पीएफआय या संघटनेवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या धमकीप्रकरणात याचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. धमकी आल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

प्रतापराव जाधव म्हणाले, वाझे मातोश्रीवर १०० खोके नेत होता

फुटबॉल सामन्यादरम्यान राडा; १२७ मृत्युमुखी

विमानतळावर ‘श्रीराम’ दिसले आणि…

शाओमीला ५ हजार ५५१ कोटी रुपयांचा दंड

भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी याप्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे यांचे हिंदुत्ववादी सरकार ज्या दिवसापासून राज्यात आलं आहे तेव्हापासून अनेकांच्या पोटात दुखत असून त्या लोकांना अशा प्रकारची टोकाची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. पण अशा प्रकारची प्रवृत्ती आता ठेचून काढली जाईल. याचा तपास केला जाईल.”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,957चाहतेआवड दर्शवा
1,976अनुयायीअनुकरण करा
51,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा