27 C
Mumbai
Tuesday, August 9, 2022
घरराजकारणमुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याची घोषणा

मुख्यमंत्री शिंदे ऍक्शन मोडमध्ये; पेट्रोलवरचा व्हॅट कमी करण्याची घोषणा

Related

विधानसभेत शिंदे- फडणवीस सरकारने १६४ मतांसह बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लगेचच ऍक्शन मोडमध्ये दिसून आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समारोपाच्या भाषणावेळी सर्वसामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या अशा तीन मोठ्या घोषणा केल्या.

रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावासाठी त्यांनी निधी मंजूर केला. राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरचा कर लवकरच कमी केला जाईल. तर शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हिरकणी गावाच्या विकासासाठी निधी मंजूरी

रायगड किल्ला ही आमची अस्मिता आहे. ज्या हिरकणीनं इतिहास घडवला. तो गाव वाचवण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

पेट्रोल आणि डिझेलवरीलल व्हॅट कमी करण्याचा निर्णय

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्युटी कमी केली. ठाकरे सरकारने दीड, अडीच रुपयांनी एक्साईज ड्युटी कमी करत सामान्यांचा अपेक्षाभंग केला होता. मात्र, एकनाथ शिंदे यांनी आता राज्यातील पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी करण्यात येईल, असं सांगितलं आहे. येत्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

आदित्य ठाकरेंना वगळून शिवसेनेच्या १४ आमदारांना व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस

पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरच्या दिशेने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोडले काळे फुगे

विधानसभेत एकनाथ शिंदे यांची तुफान बॅटिंग; भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

कोकणपट्ट्यात पावसाने जोर पकडला, नद्या दुथडी भरून वाहू लागल्या

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्राचा निर्धार

शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  जलयुक्त शिवार सारखे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या आयुष्यात अमुलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,918चाहतेआवड दर्शवा
1,924अनुयायीअनुकरण करा
15,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा