28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरक्राईमनामाअनिल देशमुखांना भगौडा घोषित करा, संपत्ती जप्त करा

अनिल देशमुखांना भगौडा घोषित करा, संपत्ती जप्त करा

Related

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशी व्यक्ती बाहेर राहणं धोकादायक असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात यावं आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.

संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची मागणी केली. अनिल देशमुख प्रकरणात आणखी एक कलाटणी आली आहे. देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचं काम करत आहेत. परवा एक घटना घडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. केला नाही दिली. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.

अनिल देशमुख यांच्या कंपनीतील घोटाळ्याचा पैसा त्यांच्या मुलांच्या कंपनीत आला आहे. त्याची चौकशी करून देशमुख यांच्या मुलांवरही कारवाई करण्यात यावी. ही आमची मागणी आहे, असं सोमय्या म्हणाले.

हे ही वाचा:

अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होणार

असा झाला जेईई घोटाळा…

अवनी लेखराची पुन्हा एकदा कमाल

वसूलीखोर ठाकरे सरकार उद्योग विरोधी

सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या यादीतल १२ वा खेळाडू हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड असल्याचं म्हटलं होतं. यावेळी त्यांना ही १२ जणांची यादी वाढणार की ही यादी संपली? असा प्रश्न करण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री स्वत: घोटाळेबाज आहेत. त्यांनी १९ बंगले बांधले. बायकोच्या नावावर बंगले बांधतात, कुठे गायब करतात माहीत नाही. हे घोटाळे असेच चालू राहिले तर यादी वाढणारच, असा सूचक इशारा त्यांनी दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,409अनुयायीअनुकरण करा
3,020सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा