23 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरराजकारणकॉंग्रेसने मोदींवर टीका करणारी पोस्ट हटवली; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

कॉंग्रेसने मोदींवर टीका करणारी पोस्ट हटवली; अंतर्गत वाद चव्हाट्यावर

बॅकफुटवर जावे लागल्याची भावना

Google News Follow

Related

मंगळवारी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा वादग्रस्त ‘डोके नसलेला’ पोस्टर आपल्या अधिकृत X हँडलवरून हटवला. पक्षाच्या अंतर्गत वादानंतर हा निर्णय घेण्यात आला.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर कॉग्रेसने ही पोस्ट टाकली होती. पण भाजपने काँग्रेसवर टीका करताना पाकिस्तानच्या पावलावर पाऊल टाकत असल्याचे म्हटले होते. त्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर आला.

सूत्रांनुसार, काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांना पोस्ट हटवण्यास सांगण्यात आले आणि अशा प्रकारची पोस्ट मंजूर केल्याबद्दल पक्षाच्या नेतृत्वाकडून कानउघाडणी करण्यात आली.

हे ही वाचा:

नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक रघुजीराजे भोसलेंची तलवार येणार महाराष्ट्रात

टार्गेट्स निवडा !! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय सैन्याला दिले स्वातंत्र्य

पहलगाममधला सर्वोत्कृष्ट अभिनय!

मग पाकिस्तानचा श्वासही बंद केला जाईल

पोस्टरमध्ये काय होतं?

काँग्रेसने पंतप्रधानांच्या अनुपस्थितीवर टीका करत एक पोस्टर शेअर केलं होतं, ज्यामध्ये एक डोके नसलेली व्यक्ती दाखवली होती आणि त्यावर ‘गायब’ असा शब्द लिहिला होता. या पोस्टमध्ये थेट नरेंद्र मोदींचं नाव घेतलं नव्हतं, पण “जबाबदारीच्या वेळी गायब” अशी टिपणी करत स्पष्टपणे त्यांच्यावर टीका केली होती.

भाजपचा संताप

भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसचा हा पोस्टर दाखवत जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसला “लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस” अशी उपमा देत सांगितलं की हा पोस्ट देशविरोधी शक्तींचे समर्थन करणारा आहे.

त्यांनी काँग्रेसवर ‘मीर जाफरच्या समर्थकांचा मंच’ झाल्याचा आरोप केला आणि राहुल गांधींच्या निर्देशाने असे पोस्ट तयार होतात असा दावा केला.

काँग्रेसकडून स्पष्टीकरण

काँग्रेस खासदार जयराम रमेश यांनी सांगितले की, “पंतप्रधान २४ एप्रिलला सौदी अरेबियातून परतले असले तरी ते थेट बिहारला प्रचारसभेसाठी रवाना झाले. प्रचारासाठी वेळ आहे, पण सर्वपक्षीय बैठकीसाठी वेळ नाही?”

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा