35 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारणकॉंग्रेसच्या आर्थिक उत्पनाचा आलेखही अधोगतीकडे

कॉंग्रेसच्या आर्थिक उत्पनाचा आलेखही अधोगतीकडे

Google News Follow

Related

देशातील जुना पक्ष म्हणून कॉंग्रेसने मोदी सरकार आल्यानंतर जी काही धास्ती घेतलीय ती विचारता सोय नाही. एकूणच पक्षाचा तर सुपडा अनेक राज्यांमधून साफ झालेला आहेच. परंतु आता आर्थिक गणितेही पक्षाच्या बाजूने दिसत नाहीत. देशातील सद्यस्थिती पाहता कॉंग्रेसचे उत्पन्न २०१८ च्या तुलनेत २५ टक्के इतके घटून ६८२ कोटी इतके झालेले आहे. २०२० च्या वार्षिक लेखापरीक्षण अहवालानुसार २०१८-१९ च्या तुलनेत कॉंग्रेसचे उत्पन्न जवळपास २५ टक्के घटलेले आहे.

२०१९-२० दरम्यान पक्षाच्या ६८२ कोटी रुपयांचे उत्पन्न होते. पक्षाने मिळवलेले उत्पन्न हे २०१८ पेक्षा खूपच घटलेले आहे. ९१८ कोटींचे या घडीला ६८२ कोटी इतके झालेले आहे. इतर राष्ट्रीय पक्ष ज्यांचे वार्षिक लेखापरीक्षण अहवाल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर अपलोड केले आहेत.

हे ही वाचा:

२० जुलैला जेफ बेझोस अंतराळात झेप घेणार

…आणि लसीकरणाच्या मुद्द्यावरून चिदंबरम पडले तोंडघशी!

समन्वय प्रतिष्ठानमार्फत ३००० ठाणेकरांचे लसीकरण

हयात रिजन्सी हॉटेल पैशांअभावी बंद

भाजपचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल अद्याप उपलब्ध नाही. आयोगाच्या अधिसूचनेत म्हटले आहे की कोविड (साथीच्या साथीचा रोग) सर्व देशभर (साथीचा रोग) साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर २०१९-२० चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२१ पर्यंत वाढविण्यात आली आहे. टीएमसी आणि बसपा या दोघांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये २०१९-२० चा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल सादर केला होता.

बाँडच्या माध्यमातून कॉंग्रेसची मिळकत ३८२ कोटी रुपयांच्या तुलनेत ३१८ कोटी रुपयांवर आता येऊन ठेपली आहे. कॉर्पोरेट जगताकडून मिळालेली देणगी ९४ कोटीवरून आता केवळ २० कोटींवर आलेली आहे. वैयक्तिक देणगीदारांचेही तसेच चित्र दिसून आले. कॉंग्रेसला सध्या केवळ २३ कोटी रकमेवरच समाधान मानावे लागले आहे. याआधीच्या वर्षात वैयक्तिक देणगीदारांकडून ५० कोटींची देणगी मिळाली होती.

कॉंग्रेसने २०१९-२० मधील निवडणुकांवर जवळपास ८६४ कोटी रुपये खर्च केले होते. त्यामध्ये निवडणूक प्रसिद्धीसाठी ४०६ कोटी रुपये खर्च केले. मतदानपूर्व सर्वेक्षणात केवळ ५.७ लाख रुपये खर्च करण्यात आले. एकूणच हा आलेख लक्षात घेतला तर आपल्याला दिसून येईल की, पक्षाला लागलेली उतरती कळा आता आलेखातही डोकावू लागलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा