29 C
Mumbai
Thursday, June 17, 2021
घर राजकारण कोरोनाला 'इंडियन व्हायरस' म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

कोरोनाला ‘इंडियन व्हायरस’ म्हणत चीनी देणग्यांची परतफेड

Related

भारतीय जनता पार्टीने टूलकिटच्या मुद्द्यावरून काँग्रेसला चांगलेच घेरले आहे. भाजपाचे राज्य आणि देश पातळीवरचे अनेक नेते हे काँग्रेसवर हल्लाबोल करत आहेत. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी तर थेट चायनीज देणग्यांच्या मुद्द्यांवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून दिलेल्या देणग्यांची काँग्रेस परतफेड करत आहे असा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

मंगळवार, १८ मे रोजी समाज माध्यमांवर काँग्रेसच्या टूलकिटचा मुद्दा चांगलाच गाजला. या टूलकिटवर काँग्रेस पक्षाचे निवडणूक चिन्ह आहे. तर काँग्रेसच्या एका संशोधन समितीने टूलकिट बनविल्याचे त्या टूलकिटमध्ये म्हटले आहे. कोविड महामारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला आणि भारतीय जनता पार्टीला कशाप्रकारे लक्ष्य करावे याचे मुद्दे या टूलकिटमध्ये मांडण्यात आले आहेत. या टूलकिटमध्ये करण्यात आलेल्या एका धक्कादायक मुद्द्यात असे म्हटले आहे की सारे जग ज्या कोरोना व्हायरसला वूहान व्हायरस म्हणते त्याच्या नव्या स्ट्रेनला ‘भारतीय स्ट्रेन’ अथवा ‘मोदी स्ट्रेन’ म्हणावे असे या टूलकिटमध्ये सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा:

सत्तेसाठी काँग्रेस देशद्रोहही करू शकते

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती

याच मुद्द्यावरून भाजपा नेते आमदार भातखळकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केले आहे. “भारताचा नंबर एकचा शत्रू असलेल्या चीनशी काँग्रेस पक्षाचा करार आहे. त्यामुळेच सारे जग जरी कोरोनाला चायनीज व्हायरस म्हणत असले तरी काँग्रेस मात्र याला इंडियन व्हायरस म्हणणार. मोदी व्हायरस म्हणणार. चीनने राजीव गांधी फाऊंडेशनला भरभरून देणग्या दिल्या आहेत त्याची परतफेड नको?” असा घणाघात भातखळकर यांनी केला आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,090सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा