28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणम्युकरमायकॉसिस बाबतदेखील मुख्यमंत्री पुन्हा कोणाचा तरी खांदा शोधणार?

म्युकरमायकॉसिस बाबतदेखील मुख्यमंत्री पुन्हा कोणाचा तरी खांदा शोधणार?

Google News Follow

Related

महाराष्ट्रामध्ये कोविड पाठोपाठ म्युकरमायकॉसिस या आजाराने देखील धुमाकुळ घालायला सुरूवात केली होती. मात्र ठाकरे सरकारकडून हा आजार केवळ ग्रामीण भागात असल्याचे सांगितले जात होते. मात्र नागपूर आणि मुंबईतील वाढत्या म्युकरमायकॉसिसच्या रुग्णसंख्येने याबाबतीतही ठाकरे सरकारचा मुखभंग करवला आहे.

कोविड उपचारा दरम्यान स्टिरॉईडचा अमर्यादित वापर झाल्यानं रोगप्रतिकारशक्ती खालावून म्युकरमायकोसिस आजारांचं संक्रमण झपाट्याने वाढतं आहे. गेल्या काही दिवसांत नागपुरात सात जणांचा या आजाराने मृत्यू नोंदवला गेला आहे. इतकंच नाहीतर बुरशीचं संक्रमण झालेले ३०० हून अधिक रुग्ण सध्या शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेते आहेत.

काळ्या बुरशीची लागण झालेल्या रुग्णांपैकी १२९ रुग्णांवर जबडा, डोळे, कान- नाक- घशासह इतरही काही शस्त्राक्रिया झाल्या आहेत. यातील सर्वाधिक ४३ रुग्ण हे एकट्या मेडिकलमध्ये उपचाराला आले होते. याशिवाय शहरातील विविध रुग्णालयांत देखील म्युकरमायकॉसिसचे रुग्ण दाखल झाले आहेत.

हे ही वाचा:

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

टोकियो ऑलिम्पिक रद्द करा, स्थानिक डॉक्टरांची मागणी

बंगालमधील अराजकता लोकशाही मूल्यांचा अस्त करणारी

भिवंडीतून १२००० जिलेटीन काड्या, ३००८ डेटोनेटर जप्त

कालच पिंपरी- चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात काही रुग्णांचा म्युकरमायकॉसिसने बळी घेतला होता. नागपूर, पुण्यापाठोपाठ मुंबईतही शंभरच्या वर म्युकरमायकॉसिसचे रुग्ण सहा दिवसांपूर्वीच आढळले होते. परंतु इतर कोणत्याही बाबतीत केवळ दावा करणाऱ्या ठाकरे सरकारने या बाबतीत देखील या आजाराचे रुग्ण ग्रामीण भागात सापडत असल्याच्या गजाली मारल्या होत्या.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून सरकारला चांगलेच सुनावले आहे. त्यांनी यावेळी मुंबईत या आजाराचा पहिला रुग्ण दगावला असल्याचे देखील म्हटले आहे आणि रुग्णशोध, तपासणी, औषधे, उपचार, शस्त्रक्रिया या स्तरांवर ठाकरे सरकारची तयारी काय आहे असा सवाल देखील त्यांनी केला आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात,

म्युकरमायकोसिसचे रुग्ण ग्रामीण भागांत सापडत आहेत, हा राज्य सरकारचा बचाव आता गळून पडलाय. मुंबईत या आजाराचा पहिला रुग्ण दगावलाय. रुग्णशोध, तपासणी, औषधे, उपचार, शस्त्रक्रिया या सर्व स्तरांवर ठाकरे सरकारची तयारी काय? की मुख्यमंत्री पुन्हा कुणाचा तरी खांदा शोधणार?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा