37 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
घरक्राईमनामाभिवंडीतून १२००० जिलेटीन काड्या, ३००८ डेटोनेटर जप्त

भिवंडीतून १२००० जिलेटीन काड्या, ३००८ डेटोनेटर जप्त

Google News Follow

Related

ठाणे पोलिसांनी कारवाई करताना १२००० जिलेटीन काड्या आणि ३००८ डेटोनेटर जप्त केले आहेत. मित्तल एन्टरप्रायजेसच्या कार्यालयावर छापे टाकून हा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे शाखा १ यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली, ज्यात त्यांना यश आले आहे.

ठाणे जिल्ह्यातील, भिवंडी तालुक्यात असणाऱ्या कारवली या गावी मित्तल एंटरप्राइजेसचे कार्यालय आहे. या कार्यलायत जिलेटीनच्या काड्या आणि डेटोनेटर्स अवैधपणे ठेवण्यात आल्याची माहिती ठाणे पोलीसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखा कक्ष १ यांनी मित्तल एन्टरप्रायजेसच्या कार्यालयावर छापे टाकले होते. या कारवाईत त्यांच्याकडून डेक्कन कंपनीच्या १२ हजार जिलेटीन कांड्या, तर सोलर आणि डेक्कन कंपनीचे मिळून ३००८ डेटोनेटर हस्तगत करण्यात आले आहेत. ह्या जिलेटीन कांड्या एकूण ६० खोक्यांमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.

हे ही वाचा:

‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?

जगाला हिटलरची गरज म्हणणाऱ्या पाक पत्रकाराची हकालपट्टी

मुंबईत अजून २४ तास पावसाची शक्यता

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झापडं मुंबई-बारामती पुरती

या प्रकरणात गुरुनाथ म्हात्रे (५३) याला अटक करण्यात आली असून त्याला स्थानिक न्यायालयात हजार करण्यात आले. न्यायालयाने त्याला २२ मे पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आरोपीचा खदानचा व्यवसाय असून त्याने हा साठा बेकायदेशीरपणे खदानीसाठी ठेवला होता. एवढ्या मोठ्या प्रमाणातला साठा ठेवण्यासाठी सेफ हाऊस असणे गरजेचे असते. पण आरोपी म्हात्रे ह्याने त्याची कुठल्याही प्रकारे सुरक्षितता न पाळता कार्यालायच्या स्टोर रूममध्ये हा साठा ठेवला होता. या बेकायदेशीर साठ्यामुळे मोठी दुर्घटना होऊन अनेकांचे प्राण त्यात गेले असते अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ठाणे गुन्हे शाखा कक्ष १ चे सहाय्य्क पोलीस निरीक्षक प्रफुल्ल जाधव यांनी पथकासह सोमवारी रात्री ही कारवाई केली असून आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम २८६ अन्वये, तर स्फोटक पदार्थ कायदा १९०८ च्या कलम ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा