30 C
Mumbai
Sunday, October 2, 2022
घरराजकारण"काँग्रेस पक्षातील कारस्थानांमुळे मला मुख्यमंत्रीपदावरून हटवले"

“काँग्रेस पक्षातील कारस्थानांमुळे मला मुख्यमंत्रीपदावरून हटवले”

काँग्रेस पक्षातील नाराजी आता हळूहळू चव्हाट्यावर येत असून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.

Related

काँग्रेस पक्षातील नाराजी आता हळूहळू चव्हाट्यावर येत असून राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आता काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. पक्षातील लोकांनीच कट कारस्थान करुन आपल्याला मुख्यमंत्री पदावरुन काढल्याचे विधान त्यांनी केले आहे. सोलापूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान ते म्हणाले.

“महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरुन काढल्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये राज्यपाल म्हणून पाठवण्यात आले. त्यानंतर दिल्लीच्या मंत्रिमंडळात गेलो. तेव्हापासून त्यांना पराभव पत्करावा लागला” असा टोला त्यांनी नाव न घेता काँग्रेस नेत्यांना लगावला आहे.

सोलापूरमध्ये महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे ‘भारत गौरव पुरस्कार’ सुशीलकुमार शिंदे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. तसेच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण दिले होते. मात्र, आता या कामची कोणाला आठवण नाही, असं ते म्हणाले. राजकीय चढ-उतार येत असतात मात्र आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे, असा सल्ला शिंदे यांनी दिला.

हे ही वाचा:

पत्रकार विजय सिंह यांना पितृशोक

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

जॅकलिनला पुन्हा ईडीचे समन्स

हॉस्टेलमधील ‘त्या’ मुलींचे व्हिडीओ काढणाऱ्या मुलीला शिक्षिकेने विचारला जाब

काँग्रेस पक्षाला सध्या काही राज्यांमध्ये गळती लागली आहे. त्यात काँग्रेसची सध्या भारत जोडो यात्रा सुरू आहे. त्यासाठी राहुल गांधी हे भारतभर फिरणार आहेत. १८ जानेवारी २००३ ते ऑक्टोबर २००४ या कालावधीत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
41,700सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा