28 C
Mumbai
Tuesday, October 4, 2022
घरराजकारण'उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला'

‘उद्धव ठाकरे यांनी लोकांच्या मतांचा अपमान केला’

राज ठाकरे यांनी नागपूरमध्ये केली घणाघाती टीका

Related

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सध्या नागपूर दौऱ्यावर असून त्यांनी विदर्भातील आपल्या पक्षाच्या वाटचालीबाबत भाष्य केलेच पण महाराष्ट्रातील राजकारणात जो गोंधळ उडालेला आहे, त्याबद्दलही ते बोलले. उद्धव ठाकरे यांनी मतदारांचा अपमान केला आहे, असेही राज ठाकरे यांनी परखडपणे सांगितले.

नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी सांगितले की,  महाराष्ट्राच्या राजकारणात इतका गोंधळ कधी पाहिला नाही. कोण कुणासोबत सत्ता स्थापन करतोय, कोण विरोधी पक्षात बसतोय असे अनिश्चित चित्र कधीही पाहिलेले नाही इतक्या वर्षांत. मतदारांना प्रचारादरम्यान एक सांगितले जाते, मग रांगेत उभे राहून लोक मतदान करतात. मतदान केल्यावर रिझल्ट लागतो तेव्हा कुणीतरी सकाळी शपथविधी करतं. मग ते फिस्कटल्यावर शिवसेना, काँग्रेस आणि एनसीपी एकत्र येतात. मग सांगायचं अमित शहा आणि मी एकत्र बसलो आणि मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा झाली. कुठून आलं हे मुख्यमंत्रीपद, ही चर्चा. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे तत्त्व आधीच ठरलेलं आहे. १९९५ ते १९९९ या युती सरकारच्या काळात शिवसेनेचे आमदार जास्त होते. त्या काळात भाजपाने मुख्यमंत्रीपदाचा दावा केल्याचे आठवत नाही. मग हा फॉर्म्युला ठरलेला आहे तर अचानक रिझल्टनंतर तुम्ही काय सांगताय मला मुख्यमंत्रीपद अडीच वर्षे ठरलं होतं आणि ते द्यायला हवं. हे का सांगितले नाही लोकांना तेव्हाच. नरेंद्र मोदी सांगत होते फडणवीस मुख्यमंत्री होणार तर तुम्ही त्यावेळी आक्षेप का घेतला नाही. लोकांनी मतदान केले. लोकांनी हा खेळ बघत बसायचा का. रांगेत उभे राहून मतदान करायचं. ते केल्यावर प्रतारणा करता मतदारांची. हा विषय महाराष्ट्राचा आहे. लोकांच्या मतांचा यांनी अपमान केला आहे.

हे ही वाचा:

टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळाडू घालणार ‘हर फॅन की जर्सी’

संजय राऊत यांचा कोठडीतला मुक्काम वाढला

जॅकलिनला पुन्हा ईडीचे समन्स

रतन टाटांच्या भेटीतून त्याला ‘कोटी कोटी’ आशीर्वाद

 

राज ठाकरे यांनी मनसेच्या विदर्भातील प्रगतीबद्दलही सांगितलं. ते म्हणाले, दोन वर्षांच्या लॉकडाऊननंतर माणसं एकमेकांना भेटायला लागली. गर्दीवरची बंधनं उठली. त्यानंतर मी प्रथमच विदर्भात येतोय. पुढे चंद्रपूर आणि अमरावतीला जाणार. सर्व प्रमुख पदं बरखास्त करतोय. घटस्थापना होईल त्यावेळी नवी कार्यकारिणी जाहीर होईल. काही नवे चेहरे असतील. १६ वर्षे झाली माझ्या पक्षाला पण जसा पक्ष दिसायला हवा होता तसा नागपूरमध्ये नाही. इतर जिल्ह्यात मला दिसतो. तरुणांना योग्य संधी देणे आवश्यक आहे. आमच्याकडून नागपूर विदर्भाच्या बाबतीत दुर्लक्ष झालं.

२७ तारखेला मुंबईत परिषद आहे. नवरात्र झआल्यावर कोल्हापूरमार्गे कोकणात जाणार मग दोन दिवसांसाठी नागपूरला येणार आणि इथल्या बांधणीवर लक्ष देईन.

पत्रकाराला झापले

सकाळ वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला राज ठाकरे यांनी यावेळी जाब विचारला. मला कुणीतरी सांगितलं की, उद्धव ठाकरेंचं सरकार चांगलं होतं, त्यांच्यासोबत जायला हवं वगैरे. असं कोण बोललं? साक्षात्कार कशातून झाला? त्यातून बातमी दिली. मला असे कुणीही बोललेले नाही. या बातमीत कोणतेही तथ्य नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी एकप्रकारे अशा हवेतल्या बातम्या देऊ नका असाच सज्जड दम पत्रकारांना भरला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,946अनुयायीअनुकरण करा
42,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा