29 C
Mumbai
Thursday, December 1, 2022
घरराजकारणकाँग्रेस निवडणुकीत बोगस मतदानाचा आरोप

काँग्रेस निवडणुकीत बोगस मतदानाचा आरोप

शशी थरूर यांचा आरोप

Google News Follow

Related

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी मतमोजणी सुरू आहे. काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष कोण होणार हे निश्चित झाले आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. पण याआधी शशी थरूर यांचे काउंटिंग एजंट सलमान सोज यांनी मोठा आरोप केला आहे. निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळाची लेखी तक्रार आम्ही निवडणूक प्राधिकरण अध्यक्षांकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.

थरूर गटाने उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि पंजाबमध्ये बनावट मतदानाची तक्रार केली आहे.मात्र त्याआधीच पक्षात कलह पाहायला मिळत आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकूण ९,९१५ प्रतिनिधींपैकी ९,५०० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी विविध पीसीसी कार्यालये आणि एआयसीसी मुख्यालयात मतदान केले.

काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी सलमान सोज यांच्यावर हल्लाबोल करत ते भाजपची भाषा बोलत असल्याचा आरोप केला आहे . तिवारी म्हणाले की, काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक पूर्णपणे निष्पक्षपणे पार पडली आहे. १७ऑक्टोबर रोजी काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. अध्यक्षपदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात थेट लढत आहे. ही निवडणूक मतपत्रिकेद्वारे झाली आहे. निकाल येण्यासाठी दुपारपर्यंत वेळ लागू शकतो.

हे ही वाचा:

पीएफआयला राम मंदिर पाडून बाबरी मस्जिद बांधायची होती

पूजा चव्हाणसाठी मी लढत असताना भास्करशेठ तुम्ही कुठल्या बिळात लपला होतात?

रॉजर बिन्नी बीसीसीआयचे नवे अध्यक्ष

पाऊस पुण्यात पुणे पाण्यात

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार शशी थरूर यांचे निवडणूक प्रतिनिधी, काँग्रेस केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून, “यूपीमधील निवडणुकांमध्ये अत्यंत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे आणि “यूपीमधील सर्व मते अवैध ठरवण्यात यावीत अशी मागणी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,948चाहतेआवड दर्शवा
1,977अनुयायीअनुकरण करा
52,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा