26 C
Mumbai
Sunday, July 21, 2024
घरराजकारणगुजरातच्या बसवरून टीका करणाऱ्या सचिन सावंत यांना वाटू लागले 'परप्रांतियां'बद्दल प्रेम

गुजरातच्या बसवरून टीका करणाऱ्या सचिन सावंत यांना वाटू लागले ‘परप्रांतियां’बद्दल प्रेम

सोशल मीडियावर झाली टीका

Google News Follow

Related

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी गुरुवारी भारताच्या टी-२०वर्ल्डकप विजेत्या संघाच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेली बस गुजरातवरून आणल्याचा आरोप करत टीका केली होती पण दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांनी एक्सवर ट्विट करत परप्रांतियांसह बंधूभावाचा संदेश दिल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. सोशल मीडियावर या पोस्टवरून टीका करण्यात आली.

सचिन सावंत यांनी विधिमंडळात या विश्वविजेत्या संघातील मुंबईच्या खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे, त्यावरून हा बंधूभावाचा संदेश दिला. तो देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही शरसंधान केले. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे या चार मुंबईकर खेळाडूंचा सत्कार विधिमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यावरून सावंत यांनी हे सगळे खेळाडू मुंबईकर असले तरी मूळचे उत्तर भारतीय आहेत, तेव्हा त्या परप्रांतियांचेही योगदान या यशात आहे, याची जाणीव असू द्या असा दावा सावंत यांनी केला.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींचा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाणाऱ्या खेळाडूंशी संवाद

तोंडावर आपटलेल्या काँग्रेसचे पुन्हा लष्करावर प्रश्नचिन्ह!

ब्रिटनमध्ये सत्तांतर; १४ वर्षांनंतर लेबर पक्ष सत्तेत

ॲड. असीम सरोदे यांची वकिलीची सनद रद्द करण्याची मागणी

सावंत यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या मुंबईच्या सुपुत्रांपैकी सूर्यकुमार यादव याचा जन्म गाझीपूर उत्तर प्रदेश आणि यशस्वी जैस्वाल याचा जन्म भदोई, उत्तर प्रदेश चा आहे. मुंबई स्वप्ननगरी आहे. यशस्वी चे यश हे ज्यांचा काही राजकीय पक्ष तिरस्कार करतात त्यांच्यापैकी एका फेरीवाल्याच्या स्वप्नांची पूर्ती आहे. शिवम दुबे याचा जन्म मुंबईत झाला असला तरी त्याचे वडील हे भदोई उत्तर प्रदेश चे आहेत. मराठी उत्तम बोलणाऱ्या आपल्या लाडक्या रोहितची मातृभाषा तेलगू आहे. मुंबईच्या विकासासाठी व मुंबईचे नाव जगात मोठे करण्यासाठी मराठी माणसाच्या खांद्याला खांदा लावून इतर प्रांतातील लोकांनीही योगदान दिले आहे. तेही मुंबईकर आहेत याचा अभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. आम्हाला तो आहेच! मुंबईकरांमध्ये मराठी परप्रांतीय असे ध्रुवीकरणाचे, द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो! जे अशा पक्षाची सत्तेसाठी साथ घेतात अशा भाजपालाही सुबुद्धी प्राप्त होवो हीच या आनंदाक्षणी प्रार्थना!

त्यावरून सचिन सावंत यांना सोशल मीडियावरून प्रश्न उपस्थित करण्यात आले की, त्यांनी गुजरातची बस असल्यावरून टीका केली होती. त्यातून गुजराती समाजाविषयी द्वेष दिसून येत असून परप्रांतियांच्या योगदानाविषयी कसा काय पुळका आला?

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा