अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि न्यू यॉर्क शहराचे नवनिर्वाचित महापौर जोहरान ममदानी यांच्यात निवडणुकीपूर्वी चांगलेच राजकीय नाट्य रंगले होते. यानंतर ट्रम्प आणि ममदानी यांची भेट झाली आणि याचे व्हिडीओ समोर आले आहेत. या भेटीवर काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली आहे. न्यू यॉर्कच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी ट्रम्प आणि ममदानी यांच्यात जोरदार वाद झाला होता, परंतु शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये त्यांची भेट मैत्रीपूर्ण होती. बैठकीच्या व्हिडिओ क्लिपला उत्तर देताना थरूर म्हणाले की लोकशाही अशाच प्रकारे काम करायला हवी. भारतात असे वातावरण पहायला आवडेल असेही ते म्हणाले.
“लोकशाही अशाच प्रकारे काम करायला हवी. निवडणुकांमध्ये तुमच्या मतांसाठी उत्कटतेने लढा. विरोध करा. पण एकदा निवडणुका संपल्या आणि लोकांनी निर्णय घेतला की, राष्ट्राच्या समान हितासाठी एकमेकांना सहकार्य करायला शिका, तुम्ही दोघेही सेवा करण्यास वचनबद्ध आहात,” असे थरूर यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की ते भारतात समान समीकरण निर्माण करण्यासाठी आपली भूमिका बजावत आहेत.
This is how democracy should work. Fight passionately for your point of view in elections, with no rhetorical holds barred. But once it’s over, & the people have spoken, learn to cooperate with each other in the common interests of the nation you are both pledged to serve. I… https://t.co/NwXPZyhn20
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) November 22, 2025
ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की ही बैठक खूप फलदायी होती आणि न्यू यॉर्कला एक उत्तम महापौर मिळेल अशी आशा व्यक्त केली. ममदानीचे कौतुक करताना ट्रम्प म्हणाले की त्यांना विश्वास आहे की डेमोक्रॅटिक नेते चांगले काम करतील आणि काही रूढीवादी लोकांना आश्चर्यचकित करतील.
हे ही वाचा:
काँग्रेसचा यू टर्न! ‘मारहाण’ करणाऱ्या पक्षांसोबत जुळवून घेण्याचे संकेत
मुर्शिदाबादला बाबरी मशीद बांधण्याचा तृणमूल आमदाराचा दावा
कोचमध्ये शिजवले नूडल्स, रेल्वे प्रशासनाच्या संतापाला उकळी
“ती चूक होती आणि आता…” NAAC च्या नोटीसला अल- फलाह विद्यापीठाने काय दिले उत्तर?
शशी थरूर यांच्या काही वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षात खळबळ उडाली आहे. त्यांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. त्यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती. काही दिवसांपूर्वी ट्विटरवरील एका पोस्टमध्ये थरूर म्हणाले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण हे आर्थिक दृष्टिकोन दाखवून दते. ताप आणि खोकल्याशी झुंजत असूनही, भाषणादरम्यान प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहून त्यांना आनंद झाला. त्यांच्या या विधानावर त्यांच्याच पक्षातून तीव्र टीका झाली. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी त्यांना ढोंगी म्हटले, तर सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या की त्यांना पंतप्रधानांच्या भाषणात प्रशंसनीय असे काहीही आढळले नाही.







