33 C
Mumbai
Saturday, November 27, 2021
घरक्राईमनामामुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार

मुंबई महानगरपालिकेत २५ वर्षांत ३ लाख कोटींचा भ्रष्टाचार

Related

भाजपाच्या मुंबई कार्यकारिणीने मांडला ठराव

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार हा भारतातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप मुंबई भाजपच्या कार्यकारिणीने केला आहे. गेल्या २५ वर्षांमध्ये तीन लाख कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे शुक्रवारी समितीने सांगितले.

‘टू जी स्कॅम (2G), थ्री जी स्कॅम (3G), कोळसा घोटाळा, कॉमन वेल्थ गेम्स (CWG) आणि इतर घोटाळे देशातून समोर आले. मात्र, स्वातंत्र्यानंतर महापालिकेतील हा घोटाळा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे.’ असे भाजप आमदार आमित साटम यांनी ठरावातून वाचून दाखवले.

मुंबई भाजपचे प्रमुख मंगल प्रभात लोढा, आमदार मिहीर कोटेचा, अतुल भातखळकर आणि खासदार मनोज कोटक आणि गोपाल शेट्टी तसेच महापालिकेचे नगरसेवकही यावेळी उपस्थित होते.

हे ही वाचा:

शाकाहाराच्या पुरस्कारामुळे महापौरांवर मांसाहारी वैतागले

‘रझा अकादमीवर बंदी घाला’

दुबळ्या राज्यकर्त्यांमुळे दंगेखोरांचे मनोधैर्य वाढले

अनिल परब शरद पवारांच्या भेटीला

महाविकास आघाडी सरकारच्या या दोन वर्षांच्या कार्यकाळात म्हाडा आणि झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) हे भ्रष्टाचाराचे केंद्र बनले आहेत, असे भाजपने म्हटले. महाविकास आघाडी सरकार हे महाविकास वसुली आघाडी सरकार बनले आहे, असेही भाजपने आरोप केले आहेत.

यापूर्वी महाराष्ट्राने असे सरकार पाहिले नव्हते. त्यामुळे मुंबई भाजपचे येत्या महापालिका निवडणुकीत महापौर भाजपचा असावा यासाठी लढाई नसून मुंबईतील नागरिकांना आणि मुंबईला न्याय मिळावा यासाठी असेल. भाजप लोकांसोबत असेल, मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईचे चैतन्य परत मिळवण्यासाठी लोकांसोबत असेल असे भाजपच्या ठरावात म्हटले आहे.

भाजपकडे सध्या महापालिकेत २२७ पैकी ८२ नगरसेवक आहेत. २०१७ मध्ये पक्षाच्या नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाली असून शिवसेनेपेक्षा फक्त दोन नगरसेवक कमी आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,506अनुयायीअनुकरण करा
4,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा