30 C
Mumbai
Sunday, July 25, 2021
घरराजकारणकृषी विभागात ‘वाझे’कडून कोट्यवधींची वसुली सुरु

कृषी विभागात ‘वाझे’कडून कोट्यवधींची वसुली सुरु

Related

सचिन वाझे प्रकरणात महाविकास आघाडी सरकार चांगलंच अडचणीत आलं असताना आता कृषी विभागातील ‘वाझे’कडून कोट्यवधी रुपयांची वसुली सुरु असल्याचा गंभीर आरोप माजी मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी केलाय. राज्यातील शेतकऱ्यांना लुटण्याचं, त्यांच्याकडून वसुली करण्याचं काम महाविकास आघाडी सरकारकडून सुरु असल्याचा आरोप निलंगेकर यांनी केला आहे. खासगी कंपन्यांना हाताशी धरत खते, बी-बियाण्यांची टंचाई निर्माण केली जात असल्याचंही निलंगेकर यांनी म्हटलंय. संभाजी पाटील-निलंगेकरांच्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

महाविकास आघाडी सरकार खासगी कंपन्यांचे दलाल म्हणून काम करत आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षा या बांधावर गेल्यावर कळत असतात. मात्र, हे सरकार फक्त मुंबई आणि बांद्रापुरतं मर्यादित आहे. या सरकारला शेतकऱ्यांची काहीही देणंघेणं नाही, अशी टीकाही निलंगेकर यांनी केलीय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची फक्त घोषणा झाली. पण मागील दोन वर्षात एक रुपयाही मिळाला नाही. एकट्या बुलडाणा जिल्ह्यात जवळपास २०० कोटी रुपये खासगी कंपनीच्या घशात घातले. लातूर जिल्ह्यातील स्थितीही साखरीच असल्याचं निलंगेकर म्हणाले.

११ लाख क्विंटलपैकी फक्त २ लाख क्विंटल बियाणी महाबीज देत आहे. खासगी आणि सरकारी भावात १ हजार ५०० ते २००० रुपयांचा फरक आहे. मुंबईतून १०० कोटी रुपये काढणारे आता एका एका जिल्ह्यात २००-२०० कोटी रुपये काढत असल्याचा घणाघात पाटील यांनी केलाय. कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या कंपन्या खताऐवजी माती देतील. फक्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एक दिवस अधिवेशन घेण्याची गरज असताना हे सरकार संपूर्ण अधिवेशन दोन दिवसांत गुंडाळत आहे. हे सरकार पळपुटं आहे. अधिवेशनात उत्तर देऊ शकत नाही, अशी टीकाही निलंगेकरांनी केलीय.

हे ही वाचा:

हाफिज सईदच्याघराबाहेर बॉम्ब स्फोट

निवडणुका रद्द करा अन्यथा भाजपाचं उग्र आंदोलन

मल्ल्या, नीरव मोदी, चोक्सी यांची ९३७१ कोटींची संपत्ती ईडी बँकांना देणार

नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईकांचे नाव देण्याचीही मागणी

यापूर्वी संभाजी पाटील-निलंगेकर यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. “मराठा आरक्षणासाठी आता रस्त्यावर उतरले नाही, तर वेळ निघून जाईल असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाजाला सावध केले. हे काँग्रेस पक्षाला सहन झालं नाही. मराठा समाजाचे आरक्षण घालवल्यानंतर आता त्यांनी त्यांच्या हक्काचं मागितलं तरीही काँग्रेसला राग का येतो,” असा सवाल संभाजी पाटील निलंगेकर यांनी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते संजय लाखे पाटील यांना विचारला होता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,287अनुयायीअनुकरण करा
2,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा