28 C
Mumbai
Sunday, August 1, 2021
घरराजकारणनवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईकांचे नाव देण्याचीही मागणी

नवी मुंबई विमानतळाला आता वसंतराव नाईकांचे नाव देण्याचीही मागणी

Related

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणचा वाद तापलेला असताना विमानताला वसंतराव नाईक यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज विधान भवन परिसरात दाखल झाले आहेत. सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी केलीय.

नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या विमानतळाला दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावर ठाम आहे. आता नामकरण वादात बंजारा समाजाने उडी घेतली आहे.

बंजारा समाजाचे महंत सुनिल महाराज यांच्या नेतृत्वात मुंबईत लक्षवेधी आंदोलन करण्यात येतंय. मुंबईच्या विधानभवन परिसरात असलेल्या वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याजवळ आंदोलन सुरु होतं. यावेळी विमानतळाला वसंतराव नाईक यांचं नाव दिलंच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणादून गेला होता. मात्र आंदोलनाची परवानगी नसल्याने पोलिसांनी त्यांची अडवणूक केली.

नवी मुंबई आणि सिडकोची संकल्पना ही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. त्यामुळे त्यांचे नाव विमानतळाला द्यावे ही आमची मागणी असल्याचं पोहरादेवीचे महंत सुनील महाराज म्हणाले. आमची मागणी सरकारने मान्य करावी, अशी विनंती त्यांनी राज्य शासनाला केली.

हे ही वाचा:

काँग्रेस पाठोपाठ ठाकरे सरकारमधील ‘हा’ पक्ष स्वबळावर

ठाकरे सरकारमध्ये ओबीसीविरोधात कट रचण्याचं षडयंत्र सुरु

बँकांच्या खासगीकरणाबाबत मोदी सरकारचे महत्वाचे पाऊल

मुंबईतील व्यापाऱ्यांची मोदींकडे मदतीची हाक

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामांतरच्या मुद्द्यावर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी नुकतंच राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी नवी विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी केली. “नवी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे अशी आमची जुनी मागणी आहे. या मागणीला घेऊन २४ जूनला आम्ही सिडकोला घेराव घालणार आहोत. या आंदोलनाची आणि आमच्या मागणीची राज ठाकरे यांना माहिती दिली, असं प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट करताना विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात यावं, अशी भूमिका मांडली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,303अनुयायीअनुकरण करा
2,120सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा