25 C
Mumbai
Tuesday, January 31, 2023
घरराजकारणलबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही

लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मविआ सरकारला टोला

Google News Follow

Related

माविआ सरकारने अडीच वर्षात शेतकऱ्यांना मदत केलेली नाही. घोषणा करूनही शेतकऱ्यांना अनुदान दिले नाही. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला आपण ५० हजार रुपये कर्ज देऊ. घोषणा केली विसरून गेले. आपल्या इथं एक म्हण आहे. मी कोणाला लबाड वैगेरे म्हणत नाही. पण, म्हण आहे. लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मविआ सरकारला लगावला. सोलापुरातील मंगळवेढा येथे शेतकरयांच्या मेळाव्यात त्यांनी ही टीका केली.

कमीतकमी पाच विधानसभेच्या अधिवेशनात आम्ही विचारायचो.५० हजार रुपयांची शेतकऱ्यांसाठी घोषणा केली. कधी देणार. कुठही गेलं की, शेतकरी विचारतात. आम्हाचा हेच आश्वासन मिळायचं. बस आता पुढच्या अधिवेशनात देऊ. शेवटपर्यतं त्यांनी काही दिलं नाही. पांडुरंगाची इच्छा होती. हे पैसे आमच्याच हातून दिले गेले पाहिजे होते. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही निर्णय केला. एका क्लिकने सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले गेले असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

हे ही वाचा:

उपमुख्यमंत्री विठुरायाचरणी! शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं जीवन सुजलाम सुफलाम व्हावं

संभाजी भिडे आणि पुरोगामी किडे

‘आळशी माणूस ऑफ द इयर’ शोधायचा असेल तर मातोश्रीवर जा

चार कोटींची ‘साडी आणि बूट’ पकडले

आपलं सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचं निर्णय घेणारं सरकार आहे.प्रामाणिक शेतकऱ्यांना अनुदान दिलं. मदत करताना एनडीआरएफच्या दुप्पट मदत आपण करतोय. त्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आपला प्रयत्न आहे. सरकारला शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडवायचे आहे. राज्यात नैसर्गिक शेतीचं मिशन राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र सुजलाम व्हावा अशी इच्छा यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.

 

मविआचा करेक्ट गेम केला

१०६ आमदार द्या मविआचा करेक्ट गेम करतो असे मी मागे बोललो होतो. पंढरपूरमध्ये बोलल्या प्रमाणे मविआचा करेक्ट गेम केला अशी आठवणही फडणवीस यांनी यावेळी करून दिली. त्याआधी पहाटे उपमुख्यमंत्री फडणवीस व त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कार्तिकी वारी यात्रेच्या निमित्ताने शासकीय महापूजा केली. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा, हिच मागणी विठ्ठलाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,916चाहतेआवड दर्शवा
2,004अनुयायीअनुकरण करा
61,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा