26 C
Mumbai
Sunday, March 26, 2023
घरराजकारण'त्या' विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी

‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी

दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना या पीडितांची माहिती देण्यास सांगितले

Google News Follow

Related

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. भारत जोडो यात्रेत महिलांच्या लैंगिक शोषणाबाबत राहूल गांधी यांनी वक्तव्य केलं होत. दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली पोलिस रविवारी राहुल गांधींना प्रत्यक्ष नोटीस देण्यासाठी गेले होते, ज्याची नोटीस स्वतः राहुल गांधींना मिळाली आहे. या नोटीसमध्ये राहुल गांधींना त्यांच्याकडे शारीरिक शोषणाची तक्रार करणाऱ्या पीडितांची माहिती शेअर करण्यास सांगितले आहे.

श्रीनगरमध्ये झालेल्या भाषणामध्ये बोलतांना राहुल गांधी म्हणाले होते की , मी चालत असतांना तुम्ही बघितले असेल की अनेक महिला रडत होत्या. तुम्हाला माहित आहे कि त्या का रडत होत्या ? यातील बहुतांश महिला अशा होत्या ज्यांनी आपल्यावर बलात्कार झाल्याचे, कोणीतरी लैंगिक शोषण केल्याचे, त्यांच्या नातेवाईकांनी लैंगिक शोषण केल्याचे सांगितले.

राहुल गांधी   पुढे म्हणाले, त्यावेळी मी एका बहिणीला म्हटले की आपण पोलिसांकडे तक्रार करू तर तिने पोलिसांना सांगू नका. तुम्हाला माहिती असावे अशी आमची इच्छा आहे पण पोलिसांना सांगू नका आमचे नुकसान होईल. आता या वक्तव्यानंतर दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी यांना या पीडितांची माहिती देण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना सुरक्षा देता येईल.

हे ही वाचा:

भास्कर जाधवांना राष्ट्रवादीचे वेध लागलेत का?

5G नंतर आता 6G ची तयारी, भारताने घेतले १००पेटंट

‘मिलेट्सचे’ यश ही भारताची जबाबदारी

कांदिवलीत महारोजगार मेळाव्याने दिल्या नोकऱ्या आणि घसघशीत पगार

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी बुधवारी राहुल गांधींना भेटायला गेले, मात्र तीन तास प्रतीक्षा करूनही राहुल गांधींनी त्यांची भेट झाली नाही. यानंतर गुरुवारी वरिष्ठ अधिकारी पुन्हा भेटायला गेले. राहुल गांधी त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ मागितला, मात्र राहुल गांधी यांनी आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगितले असे सांगितले. त्यामुळे आता दिल्ली पोलीस पुन्हा या विधानाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक एकदा राहुल गांधी यांच्या घरी पोहचले आहेत.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,035अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा