29 C
Mumbai
Friday, April 26, 2024
घरक्राईमनामाखलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग फरार घोषित

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग फरार घोषित

राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू.अनेक खलिस्तान समर्थकांना ताब्यात घेण्यात आले.

Google News Follow

Related

खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग यांच्यावर पंजाब पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी अमृतपाल सिंगला फरार घोषित केले आहे. त्याच्या दोन गाड्या जप्त करण्यात आल्या. अमृतपालच्या शस्त्रधारी सहकाऱ्यांनाही पकडण्यात आले आहे. पोलीस या शास्त्रांची कायदेशीर वैधता तपासून बघत आहे. पंजाब पोलीस अमृतपाल सिंगला अटक करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. आतापर्यंत ७८ जणांना अटक करण्यात आली असून सखोल तपासणी मोहीम सुरू असल्याचे जालंधर पोलीस आयुक्त कुलदीप सिंग चहल यांनी म्हटलं आहे.

अमृतपालच्या विरोधात राज्यभरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. अनेक खलिस्तान समर्थकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमृतपाल सिंगसह इतर अनेक जण फरार असून त्यांना पकडण्यासाठी मोठी शोध सुरू असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली आहे. अमृतपालसिंगच्या सहा सहकाऱ्यांना याआधीच अटक करण्यात आली आअटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक बोअर रायफल, सात १२ बोअर रायफल, एक रिव्हॉल्व्हर आणि ३७३ काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

अमृतपाल त्याच्या साथीदारांसह जालंधरच्या शाहकोट मलसियान रोडवर पोहोचल्याची माहिती पोलिसांना शनिवारी मिळाली होती. जवळपास ६० पोलिसांच्या गाज्ञानी पाठलाग करून अमृतपालला पकण्याचा प्रयत्न केला. दरम्यान,जालंंदर आणि मोगा पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. अनेक किलोमीटर पाठलाग करूनही पोलिस त्याला पकडू शकले नाहीत. पाठीमागे पोलिसांना पाहून त्यांच्या चालकाने गाडी लिंक रोडच्या दिशेने वळवून तेथून पळ काढला.

हे ही वाचा:

‘त्या’ विधानाची माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक पोहचले राहुल गांधी यांच्या निवासस्थानी

ठाण्याची एकमेव धावपटू निधीसिंगला चेन्नईमध्ये यश

तुर्की-सीरियानंतर आता ६. ७ तीव्रतेच्या भूकंपाने इक्वेडोर हादरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज खेडमध्ये जाहीर सभा

अमृतपालवर तीन गुन्हे दाखल
अमृतपालवर अमृतसर जिल्ह्यातील अजनाला पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. आपला जवळचा मित्र लवप्रीत सिंगच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या अमृतपालने त्याच्या समर्थकांसह २३ फेब्रुवारी रोजी अजनाला पोलिस स्टेशनवर हल्ला केला. त्याच्यावर कारवाई न केल्याने पंजाब पोलिसांवर बरीच टीका झाली होती. अमृतपालवर श्रीगुरु ग्रंथ साहिबच्या वेशात पोलीस ठाण्यात पोहोचून जमावाला हल्ल्यासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. याशिवाय त्याच्यावर चिथावणीखोर भाषण केल्याचा गुन्हाही दाखल आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा