32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरराजकारण'वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम'

‘वज्रमूठ सभा म्हणजे निराश लोकांचा कार्यक्रम’

वज्रमुठ सभेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा

Google News Follow

Related

महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा सोमवार, १ मे रोजी मुंबईत पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरेंनी आणि इतर नेत्यांनी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सभेवर प्रतिक्रिया दिली आहे.

कालची वज्रमूठ सभा ही निराश लोकांची सभा असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. सत्ता गेल्यामुळे महाविकास आघाडी बावचळली आहे. सरकार गेल्यामुळे नैराश्य आल्याची खोचक टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. हे बोलणारे लोकं आहेत. त्यांनी १ रूपयांत उपचार देण्याची घोषणा केली होती पण आपला दवाखाना नावाची योजना आम्ही सुरू केली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

बारसू रिफायनरीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंचा दुटप्पी चेहरा उघड झाला आहे. रिफायनरीच्या माध्यमातून ही लोक उघड पडली आहे. रिफायनरीला स्थानिकांचे समर्थन आहे. सध्या बाहेरून लोक आणून आंदोलन सुरू आहे. रिफायनरी बारसूमध्ये करा असं पत्र हेच देतात आणि त्यानंतर तेच विरोध करतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

बाबरी मशीद पडत असताना आम्ही त्या ठिकाणी होतो. त्यावेळी उद्धव ठाकरे कुठे होते? याच उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला हवे. मुंबईच्या बाहेर तरी पडला होता का? असे खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंना जनाब बाळसाहेब म्हणणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवावं हे आश्चर्य असल्याचंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणुका रोज होत नसतात आणि योग्य वेळी निवडणुका होतील. तेव्हा त्यांची जागा दाखवू, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

हे ही वाचा:

केरळ स्टोरीवर सरकारकडून बंदीची मागणी वितरक मात्र पाठीशी

काली मातेच्या त्या फोटोवरून युक्रेनने टेकले गुडघे

लखनऊमध्ये गंभीर-विराट भांडण, दंडाची शिक्षा

गँगस्टर- राजकारणी मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारीची खासदारकी रद्द!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांचा पाठिंबा आहे. नरेंद्र मोदींवर जितकी टीका करणार तितके लोक त्यांना पराभूत करणार. नरेंद्र मोदी यांना शिविगाळ करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस हे सध्या खरीप पीक लागवडी संदर्भातल्या बैठकीसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर टीका केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा