28.2 C
Mumbai
Tuesday, August 4, 2026
घरराजकारणदिपके राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत, २०२९ हे लक्ष्य

दिपके राजकीय भूमिका घेण्याच्या तयारीत, २०२९ हे लक्ष्य

मुलाखतीत केले मतप्रदर्शन

Google News Follow

Related

दिल्लीच्या जंतर मंतर येथे झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपकेने आता आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे.

आम्हाला राजकीय स्टँड घ्यावाच लागेल. त्या शिवाय आपण राहू शकत नाही. आपण गाडीत पेट्रोल टाकतो. पेट्रोलच्या किमती राजकारणी ठरवतात. टुथब्रशच्या किमतीही सरकारच ठरवतं. जे म्हणतात माझा राजकारणाशी संबंध नाही, त्यांना सांगतो तुम्ही अराजकीय नाही.. मी राजकीय आहे. मी स्पष्टपणे सांगतो. आम्ही धर्मेंद्र प्रधानांच्या वेळी राजकीय स्टँड घेतला. आम्ही २०२९ पर्यंत पॉलिटिकल स्टँड घेण्याचा पर्याय निवडला आहे, असे दिपके याने सांगितले.

हे ही वाचा:

एनजीओंनी दाखविली ताकद

मोदींच्या प्रत्येक राष्ट्रीय सुरक्षा निर्णयामागे डोवालांचा सल्ला!

उद्धव ठाकरेंना अभिजित दीपकेच्या लग्नाची काळजी!

‘भाई’गिरीविरुद्ध गुन्हा; बनावट व्हीडिओ केला शेअर

दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलन आता संपले आहे. नीट पेपरफुटी घोटाळ्यामुळे सुरू झालेले कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनामुळे धर्मेंद्र प्रधान यांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. आता दिपके आपल्या छत्रपती संभाजीनगरातील घरी पोहोचला असून त्याची प्रकृती सध्या बिघडलेली आहे आणि तो उपचार घेत आहेत. टीव्ही ९ ने दिपकेच्या घेतलेल्या मुलाखतीत त्याने आपल्या राजकीय भूमिकेबद्दल मत व्यक्त केले. या मुलाखतीत तो अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलला. भविष्यात कॉकरोच जनता पार्टीची वाटचाल कशी असेल, याविषयीही त्याने मतप्रदर्शन केले.

निवडणूक आल्यावर आम्ही राजकीय स्टँड घेऊ

आमचा पॉलिटिकल स्टँड हा सरकारच्या बाजूने नसेल आणि विरोधकांच्या विरोधात नसेल. लोकशाही बळकट करण्यावर असेल. मला जेन झीला सांगायची गरज नाही. कुणाला मतदान करावं किंवा करू नये हे तेच ठरवतील. ते स्मार्ट आहेत. निवडणूक आल्यावर आम्ही राजकीय स्टँड घेऊ. सरकारने चुकीचे काही केले तर आम्ही त्यांच्याविरोधात बोलू. पण मतदान कुणाला करावे हे आम्ही सांगणार नाही, असेही दीपके म्हणाला.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा