26 C
Mumbai
Saturday, February 14, 2026
घरराजकारणदिशा चालवणार वडिलांचा वारसा

दिशा चालवणार वडिलांचा वारसा

भाजपातर्फे वॉर्ड ८० मधून उमेदवारी

Google News Follow

Related

अंधेरी पूर्वच्या वॉर्ड क्रमांक ८० मध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून जनतेसाठी २४ तास उपलब्ध असणारे भाजपाचे निस्सीम कार्यकर्ते दिवंगत सुनील यादव यांच्या कन्या दिशा यादव यांना या वॉर्डमधून भाजपाने उमेदवारी दिली आहे. आपल्या वडिलांचा संस्मरणीय वारसा यापुढेही सुरू ठेवण्याचा निश्चय दिशा यादव यांनी व्यक्त केला आहे.

मंगळवारी दिशा यादव यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तेव्हा मोठ्या संख्य़ेने लोक त्या मिरवणुकीत उपस्थित होते.

सुनील यादव यांनी करोनाच्या अत्यंत कठीण काळात केलेले कार्य अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. त्यांनी या संकटकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सगळ्यांच्या मदतीसाठी धाव घेतली. लोकांना आवश्यक ती मदत पोहोचवणे, त्यांच्या उपचारासाठी धावपळ करणे, त्यांना रुग्णालयात दाखल करणे, त्यांना औषधे उपलब्ध करून देणे अशी सगळी कामे त्यांनी अहोरात्र केली. याच दरम्यान त्यांनाही करोनाने गाठले आणि त्यातच त्यांचे दुर्दैवी निधन झाले. पण त्यांनी या काळात केलेले कार्य लोकांनी कायम लक्षात ठेवले. सुनील यादव यांनी जनतेसाठी केलेले ते कार्य आपणही अविरत सुरू ठेवू, अशी ग्वाही दिशा यादव यांनी दिली आहे.

अर्ज भरण्यासाठी काढलेल्या मिरवणुकीत पत्रकारांशी बोलताना दिशा यादव म्हणाल्या की, मला अत्यंत आनंद होत आहे. मी वडिलांनी केलेले कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. या वॉर्डमधील सगळे लोक हा माझा परिवार आहे. आमचा य़ादव परिवार त्यांच्यासाठी कायम तत्पर राहील. मी पूर्ण प्रयत्न करीन की माझ्या कामात कोणतीही उणीव राहणार नाही.

हे ही वाचा:

दहशतवादी गटाशी संबंध असल्याप्रकरणी आसाममधून ११ जणांना अटक

राजस्थानमधून १५० किलो स्फोटके जप्त

चांदीपासून कॉपरपर्यंत मोठी घसरण

कॅलिफोर्नियात भूकंपाचे धक्के

दिशा यादव यांच्या मातोश्री आणि दिवंगत सुनील यादव यांच्या पत्नी संध्या यादव म्हणाल्या की, मी सगळ्यांना धन्यवाद देते. महायुतीचे सगळे कार्यकर्ते आज इथे उपस्थित आहेत. मोठ्या संख्येने लोक अर्ज भरण्यासाठी आले त्यांचे धन्यवाद. ८० क्रमांकाच्या वॉर्डमधील प्रत्येक रहिवासी हा आमचा परिवार आहे. सुनील यादव यांनीही या सगळ्या लोकांकडे आपला परिवार म्हणून पाहिले. त्यामुळे माझी मुलगी दिशा ही सुनील यादव यांचे कार्य पूर्ण करण्याचे काम करेल आणि त्यांचे नाव उज्ज्वल करेल.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
291,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा