27 C
Mumbai
Wednesday, August 17, 2022
घरदेश दुनियाद्रौपदी मुर्मू प्रचंड मताधिक्याने विजयी; ठरल्या भारताच्या १५व्या राष्ट्रपती !

द्रौपदी मुर्मू प्रचंड मताधिक्याने विजयी; ठरल्या भारताच्या १५व्या राष्ट्रपती !

Related

भाजपाप्रणित एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक मोठ्या फरकाने जिंकली आहे. द्रौपदी मुर्मू या आता भारताच्या १५व्या राष्ट्रपती असतील. शिवाय, भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती म्हणूनही त्यांना मान मिळाला आहे. शिवाय, पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणूनही त्यांना सन्मान मिळाला आहे. या निवडणुकीत मुर्मू यांनी विरोधी गटाचे यशवंत सिन्हा यांना पराभूत केले. या निवडणुकीत एनडीएच्या नसलेल्या १७ खासदारांनी मुर्मू यांना मतदान केल्याचे तसेच महाराष्ट्रातूनही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी मुर्मू यांना मतदान केल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकप्रकारे हा विरोधकांना मोठा धक्का मानला जात आहे.

मुर्मू यांनी एकूण वैध मतांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक मते घेतली. आता राष्ट्रपतीपदाची शपथ त्या २५ जुलैला घेतील. २४ जुलैला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपत आहे.

मुर्मू यांनी पहिल्या फेरीपासूनच प्रतिस्पर्धी उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा अधिक मतांची आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीत मुर्मू यांना ७८० पैकी ५४० मते पडली तर यशवंत सिन्हा यांना २०८ मते पडली. खासदारांच्या प्रत्येक मताचे मूल्य ७०० असून मुर्मू यांना एकूण ५ लाख २३ हजार ६०० इतके मूल्य प्राप्त झाले. याचा अर्थ एकूण मतांपैकी ७२.१९ टक्के इतके मूल्य त्यांच्या पारड्यात पडले.

हे ही वाचा:

प्रफुल्ल पटेल ईडीच्या रडारवर; वरळीतील घरावर टाच

केजरीवाल यांच्या सिंगापूर दौऱ्याला नायब राज्यपालांचा ‘रेड सिग्नल’

आदित्य ठाकरेंनी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; गावकऱ्यांचा जीव मुठीत

व्हायरल व्हिडिओमध्ये नाना? चित्रा वाघ यांच्या ट्विटवर कारवाईचा इशारा

 

१० राज्यातील ११३८ आमदारांपैकी ८०९ आमदारांनी मुर्मू यांना मते दिली तर यशवंत सिन्हा यांना ३२९ मते मिळाली. आंध्र प्रदेशची सर्व मते मुर्मू यांना मिळाली तर अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश व झारखंडकडूनही सगळी मते मुर्मू यांना मिळाली.

१५ खासदारांची मते अवैध ठरली. या निवडणुकीत एकूण आठ खासदारांनी मतदान केले नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,914चाहतेआवड दर्शवा
1,919अनुयायीअनुकरण करा
23,100सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा