27.4 C
Mumbai
Wednesday, October 28, 2026
घरराजकारणमेट्रोमॅनच्या राजकीय इनिंगला सुरूवात

मेट्रोमॅनच्या राजकीय इनिंगला सुरूवात

Google News Follow

केरळ भाजपचे प्रदेश अध्यक्ष के सुरेंद्रन् यांनी केरळ मधील १६ सदस्यीय राज्य निवडणूक समितीची घोषणा केली. नुकतेच भारतीय जनता पार्टीत शिरलेल्या मेट्रोमॅन इ श्रीधरन् यांचा देखील या समितीत समावेश करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

‘भ्रष्टाचाराचा कोविड’ ही पुस्तिका भाजपा कडून प्रकाशित

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या संमतीनंतरच ही घोषणा करण्यात आल्याचे कळले आहे.

सुरेंद्रन् यांच्याशिवाय या समितीत केंद्रीय मंत्री वी मुरलीधरन्, राष्ट्रीय उपाध्यक्ष ए पी अब्दुल्लाकुट्टी, माजी प्रदेश अध्यक्ष कुम्मनम राजशेखरन्, विधानसभा सदस्य ओ राजगोपाल, सी के पद्मनाभन, पी के कृष्णदास, प्रदेश सचिव एम टी रमेश आणि मेट्रोमॅन इ श्रीधरन यांचा समावेश आहे.

याबरोबरच पक्षामध्ये उमेदवार निवडीची प्रक्रिया देखील चालू आहे. या बाबत महत्त्वाचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत घेतला जाण्याची शक्यता आहे.

केरळमध्ये लवकरच विधानसभेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. त्यासाठी भाजपातर्फे प्रचार सुरू करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिनांक २१ फेब्रुवारी रोजी विजय यात्रेला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले होते. तिरुवनंथपुरम येथे अमित शहा यांच्या उपस्थितीत दिनांक ७ मार्च रोजी या यात्रेची सांगता होणार आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा