33 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरक्राईमनामाईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’

ईडी म्हणते, ‘मनी लाँड्रिंग प्रकरणात परब यांची चौकशी आवश्यक’

अनिल परब यांचे नाव नाही, पण चौकशी आवश्यक असल्याचे म्हणणे

Google News Follow

Related

माजी मंत्री आणि शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी दापोली येथे जमीन खरेदी करण्यासाठी आणि त्यावर साई रिसॉर्ट बांधण्यासाठी बेहिशेबी रोख रक्कम वापरली होती, असे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आरोपपत्रात म्हटले आहे. ईडीने परब यांचे जवळचे मित्र सदानंद कदम आणि इतर पाच जणांविरुद्ध दाखल केलेल्या या आरोपपत्रात परब यांचे नाव आरोपी म्हणून दिलेले नाही. मात्र त्यांची चौकशी आवश्यक असल्याचे नमूद केले आहे.

जमीन खरेदीसाठी वापरल्या गेलेल्या रकमेचा मोठा भाग कायदेशीर बँकिंग पद्धतीने अदा करण्यात आला होता. मात्र परब यांच्या भूमिकेबाबत सविस्तर चौकशी आवश्यक असल्याचे ईडीने आरोपपत्रात म्हटले आहे. ‘ज्या तक्रारीवर आणि एफआयआरवर मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास सुरू आहे, त्यामध्ये अनिल परब यांची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रथमदर्शनी दिसते आहे. मनी लाँड्रिंग गुन्ह्यांतर्गत प्राप्ती कर विभागानेही साई रिसॉर्ट जप्त करण्याचा आदेश दिला आहे. परब हे रिसॉर्टचे लाभार्थी मालक आहेत आणि कदम हे बेनामीदार आहेत. त्यामुळे अशा प्रकारे, मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात परब यांच्या सहभागाच्या शोधासाठी पुढील तपास करणे आवश्यक आहे,’ असे ईडीने म्हटले आहे.

हे ही वाचा:

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या तपासावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?

आयसीसीच्या महसुलातून बीसीसीआयची कमाई १८ हजार कोटी

२६ नक्षलवाद्यांना यमसदनी धाडणाऱ्या महाराष्ट्राच्या तीन पोलिसांचे राष्ट्रपतींकडून कौतुक !

सत्तासंघर्षाचा पेच उद्या सुटणार?

रिसॉर्टच्या बांधकामातील अनियमिततेशी संबंधित फसवणुकीचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे. ‘कदम यांनी बांधकामासाठी उशिराने त्यांच्या वह्यांमध्ये खर्च दाखविले. तसेच, खर्च भागवण्यासाठी सुमारे ३.६ कोटी रुपये रोखीने दिल्याचे दाखवले. परब यांनी कदम यांच्या मदतीने सरकारी जमिनीवर जवळच्या पदपथांसह दुमजली साई रिसॉर्ट एनएक्स बेकायदा बांधले. त्यामुळे, जमिनीवर उभी असलेली इमारत ही मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यातील कलमातील, गुन्ह्याच्या कमाईच्या व्याख्येनुसार गुन्ह्याची रक्कम आहे, असे आरोपपत्रात म्हटले आहे.

मंगळवारी विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी आरोपपत्राची दखल घेतली. सद्यस्थितीत कदम आणि दापोलीचे माजी उपविभागीय अधिकारी जयराम देशपांडे तुरुंगात आहेत. त्यांच्या जामीन अर्ज प्रलंबित आहेत. आरोपपत्रात म्हटले आहे की, विभास साठे (मूळ जमीन मालक) यांच्याकडून जमीन खरेदी करताना ८० लाख रुपयांच्या बेहिशेबी रोख रकमेचा वापर वास्तविक विक्री मूल्य दडपण्यासाठी करताना कदम यांनी परब यांना मदत केली. सीआरझेडच्या नियमांचे उल्लंघन करून परब यांनी आपले बेहिशेबी पैसे रोख रकमेत गुंतवून रिसॉर्ट बांधले आणि किनाऱ्यावरील पर्यावरण व पर्यावरणाला जाणीवपूर्वक हानी पोहोचवली.

 

बांधकामाचा खर्च जाणूनबुजून रोख स्वरूपात आणि परब यांच्या नावावर जमिनीची नोंदणी करण्यापूर्वी करण्यात आल्याचे उघड आहे. बेहिशेबी पैशांचा वापर आणि इमारतीच्या मालकाची ओळख लपवण्याच्या उद्देशाने हे केले गेले, असाही आरोप करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा