30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणसत्तासंघर्षाचा पेच उद्या सुटणार?

सत्तासंघर्षाचा पेच उद्या सुटणार?

सत्तासंघर्षाचा निकाल उद्या येणार असल्याची जोरदार चर्चा

Google News Follow

Related

सध्या साऱ्या राज्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या सत्ता सत्तासंघर्षाच्या निकालाकडे लक्ष आहे. अशातच हा निकाल उद्या येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एका सुनावणी दरम्यान ही टिपण्णी केली आहे. घटनापीठाकडून उद्या दोन महत्वाचे निकाल देण्याचे संकेत सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशांनी दिले आहेत. त्यामुळे सत्ता संघर्षावरही उद्या निकाल लागण्याची दाट शक्यता आहे.

सत्तासंघर्षाचा निकाल उद्या किंवा परवा म्हणजेच ११ किंवा १२ मे रोजी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.१६ आमदार अपात्र ठरणार की पात्र ठरणार याबद्दल उद्या निकाल येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सत्ता संघर्षातील सर्व प्रलंबित याचिकांवर निकाल एकत्रित लागण्याची शक्यता आहे. १६ आमदारांच्या अपात्रते संदर्भात निर्णय कोणी घ्यायचा हा प्रश्न असणार आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्ष घेत असतात. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावली होती. मात्र, त्या सोळा आमदारांनी त्या उपाध्यक्षच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. उपाध्यक्षांना निर्णय घेता येत नसल्याने सर्वोच न्यायालय काय निर्णय घेत याकडे लक्ष असणार आहे.

जून २०२२ मध्ये तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील आपल्या ४० सहकारी आमदारांसह उठाव केला. त्यानंतर बहुमत गमावलेलं ठाकरेंच सरकार कोसळलं. पुढे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात नवं सरकार स्थापन केलं आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हाती घेतली. दरम्यान, शिवसेनेचा व्हिप न पाळल्याप्रकरणी तत्कालीन पीठासीन अधिकारी नरहरी झिरवाळ यांनी शिवसेनेच्या १६ आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली होती. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले.

हे ही वाचा:

‘गो फर्स्ट’च्या ५५ विमानांकडे एअर इंडिया, इंडिगोचे लक्ष

भारतातील ४२,००० कुशल कामगारांना इस्त्रायलमध्ये नोकरीच्या संधी

आता परदेशातील प्रेक्षकही बघणार ‘द केरला स्टोरी’

पैनगंगा नदीच्या पुलावरून ट्रॅव्हल्स कोसळून भीषण अपघात

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आम्हीच असल्याचा दावा केला होता. त्यामुळे दोन गट पडले होते. या काळात अंधेरीची पोटनिवडणूक लागल्यानं यासाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट अशा दोन्ही गटांना नाव आणि चिन्ह दिले होते. त्यानंतर अनेक घडामोडींनंतर निवडणूक आयोगाने अंतिम निकाल देत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा गट हाच मूळ शिवसेना असल्याचं घोषीत केलं आणि त्यांना धनुष्यबाण हे चिन्हही दिले. यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं.

या १६ अमदारांबाबत होणार निर्णय

  1. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखाडी
  2. तानाजी सावंत – भूम परंडा
  3. अब्दुल सत्तार – सिल्लोड
  4. यामिनी जाधव – भायखळा
  5. संदीपान भुमरे – पैठण
  6. भरत गोगावले – महाड
  7. संजय शिरसाठ – छत्रपती संभाजीनगर पश्चिम
  8. लता सोनावणे – चोपडा
  9. प्रकाश सुर्वे – मागाठाणे
  10. बालाजी किणीकर – अंबरनाथ
  11. बालाजी कल्याणकर – नांदेड उत्तर
  12. अनिल बाबर – खानापूर
  13. संजय रायमूलकर – मेहेकर
  14. रमेश बोरनारे – वैजापूर
  15. चिमणराव पाटील – एरोंडोल
  16. महेश शिंदे – कोरेगाव
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा