33 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
घरराजकारण'फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्वप्नातला मुख्यमंत्री केला'

‘फडणवीसांनी बाळासाहेबांच्या स्वप्नातला मुख्यमंत्री केला’

Google News Follow

Related

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यंमत्री होतील अशी, घोषणा केली आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन आणि आनंद दिघे यांची शिकवण घेऊन महाराष्ट्राला पुढे घेऊन जाणार असं यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

बाळासाहेब ठाकरेंच हिंदुत्व, त्यांची भूमिका आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे यासाठी पुढे निघालेलो आहेत. शिवसेनेचे आणि अपक्ष असे ५० आमदार आम्ही काही दिवस एकत्र आहोत, एक वैचारिक भूमिका, राज्याचा विकास आणि अडीच वर्षापूर्वी जे घडलं, ते आपल्याला माहित आहे. गेल्या अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांना आपल्या मतदारसंघातील समस्या, विकास प्रकल्प, अडचणी याबाबत वारंवार माहिती दिली. मात्र यावर काही तोडगा निघाला नाही. महाविकास आघाडी सरकारबाबत आमदारांमध्ये नाराजी होती. पुढच्या निवडणुकीत जिंकण अवघड होते. मविआ सरकारच्या काळात काही निर्णय घेता येत नव्हते. नामांतरासारखे निर्णय आधीच व्हायला हवे होते, असे एकनाथ शिंदे म्हणले आहेत.

पुढे ते म्हणाले, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन आणि आनंद दिघे यांची शिकवण घेऊन महाराष्ट्र पुढे घेऊन जाणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचे १२० आमदार असूनही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे आणि बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला संधी दिली. ही ऐतिहासिक घटना आहे. मात्र जेव्हा ५० आमदार वेगळी भूमिका घेतात, तेव्हा त्याच आत्मपरिक्षण करण्याची गरज होती. आपण तर नगरविकास मंत्री होतो, पण आमदारांच्या मतदारसंघात मोठ्या समस्या होत्या. त्यासाठी प्रयत्न करुनही उत्तर मिळाले नाही, म्हणून आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. राज्यातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी निर्णय घ्यावा लागला आहे. याबद्दल देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांचे एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

‘बंडखोर आमदार आणि शिवसेनेत पडलेल्या अंतराला फक्त संजय राऊत जबाबदार’

संभाजीनगर नामकरणावरून काँग्रेसच्या २०० मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

मास्टरस्ट्रोक…. फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री!

ही हिंदु्त्वाची लढाई आहे, आम्हाला पदे नको होती!

कोणत्याही पदासाठी हे केलेले नाही. राज्याच्या विकासाला पुढे घेऊन जाऊ. देवेंद्र फडणवीसांनी मनाचा खूप मोठेपणा दाखवला आहे. मंत्रिमंडळात नसले तरी ते आमच्यासोबत आहेत असा मोठेपणा दिसत नाही, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे. राज्यात एक मजबूत सरकार येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांचे पाठबळ मिळेल. ज्या राज्याबरोबर केंद्राची ताकद उभी राहते तिथे विकासाला कोणताही अडथळा येणार नाही. हे सरकार विकासासाठी कटिबद्ध आहे. लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करणार असे एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच जनतेचा कधीही विश्वास तोडणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा