25 C
Mumbai
Thursday, September 22, 2022
घरराजकारणदाऊद, याकूबचे हस्तक होण्यापेक्षा मोदी, शहांचे हस्तक होणे काय वाईट?

दाऊद, याकूबचे हस्तक होण्यापेक्षा मोदी, शहांचे हस्तक होणे काय वाईट?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले खुले आव्हान

Related

पैठण येथे झालेल्या भरगच्च सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चौफेर टीका केली. लाचार, गद्दार, मोदी व शहांचे हस्तक अशा पद्धतीने केल्या गेलेल्या उल्लेखाबद्दल एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रहार उद्धव ठाकरे यांच्यावर केला. दाऊद आणि याकूब यांच्या कबरीला परवानगी देऊन त्यांचे हस्तक होण्यापेक्षा बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे हस्तक होणे काय वाईट अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी शरसंधान केले.

ते म्हणाले की, शिंदे गटावर टीका करण्यासाठी सकाळ, दुपार, संध्याकाळ तीन डोस घेतल्याशिवाय काहींची मळमळ थांबतच नाही. पण तुमच्या खोक्यांचा हिशेब आताच काढणार नाही. पण आता विरोधकांकडे केवळ खोके आणि गद्दार हेच शब्द उरले आहेत. एकनाथ शिंदे म्हणजे साबणाचे बुडबुडे म्हणालात ना पण याच साबणाने तुमची धुलाई केली हे विसरू नका.

सांदिपान भुमरे यांच्या मतदार संघात मोठ्या जल्लोषात एकनाथ शिंदे यांचे स्वागत झाले. सभेला तर प्रचंड गर्दी होतीच पण मुख्यमंत्री तिथे आले तेव्हाही रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून लोकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.

हे ही वाचा:

लघु शंकेमुळे येते दीर्घ शंका

दादर, प्रभादेवीत का होतोय राडा?

बारामतीचे अझीम ओ शान शहंशाह!

पाकिस्तान विरुद्ध विजयाचा आनंद श्रीलंकेपेक्षा अफगाणिस्तानला जास्त

 

खरी शिवसेना कुणाची याचे उत्तर आता मिळाले असेल. ही पैसे देऊन आणलेली गर्दी नाही. ही सच्च्या शिवसैनिकांची गर्दी आहे. सांदिपान भुमरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्यांची ही गर्दी आहे.

‘रोखठोक’मध्ये मराठी माणसाचा टक्का का घसरला त्याचे आकडे टाका

सामना या शिवसेनेच्या मुखपत्रावरही एकनाथ शिंदे यांनी टीका केली. ते म्हणाले की, मुंबईत मराठी माणसाचा किती टक्का आहे, याची आकडेवारी एकदा सामनाच्या रोखठोकमधून जाहीर करावी. निवडणुकीसाठी मराठी माणसाचा मुद्दा उपस्थित करायचा पण आता मराठी माणूस देशोधडीला का लागला याचा विचार करायला हवा. केवळ मतांसाठी वापर करायचा आणि नंतर विसरून जायचे. ही जुनी पद्धत आहे.

अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील धुसफूसही एकनाथ शिंदे यांनी भाषणात दाखवून दिली. ते म्हणाले की, कसं काय पाटील बरं आहे का, दिल्ली जे झालं ते खरं आहे का? राज्या अजितदादांना थांबवता येत नाही, म्हणून दिल्लीत थांबवलं का?

सुप्रिया सुळे यांच्यावरही त्यांनी टीका केली. आधी दादा आणि आता ताई टीका करताहेत. कुणी निंदा, कुणी वंदा, टीका करणे हा विरोधकांचा धंदा. पण मी कामाने उत्तर देणार. दादा सहा वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात असे ताई म्हणतात पण मी सहा वाजेपर्यंत काम करत असतो.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,957चाहतेआवड दर्शवा
1,942अनुयायीअनुकरण करा
38,800सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा