आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांनी पुन्हा एकदा गोगोई यांना पाकिस्तानी एजंट असल्याचे म्हणत टीका केली आहे. सरमा यांनी दावा केला आहे की, परदेशी शक्तींनी त्यांना त्यांच्या फायद्यासाठी भारतात बसवले आहे. सरमा यांनी गोगोई यांना आव्हान दिले आहे की जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मानहानीचा खटला दाखल करावा.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आरोप करताना म्हणाले की, गायक झुबिन गर्ग यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्यानंतर ते गोगोई यांच्यावर करत असलेले आरोप सिद्ध करतील. सरमा म्हणाले, “गौरव गोगोई हे पाकिस्तानी एजंट आहेत. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. त्यांना परदेशी शक्तींनी आपल्या देशात बसवले आहे. मी हे तथ्यांसह सांगत आहे. मी एक दिवस सिद्ध करेन.”
गौरव गोगोई यांची पत्नी एलिझाबेथ कोलबर्नचे पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएआयशी संबंध असल्याचा आरोप आहे. यूकेमध्ये जन्मलेल्या एलिझाबेथ यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आंतरराष्ट्रीय राजकीय अर्थव्यवस्थेत पदव्युत्तर पदवी घेतली आहे. २०१३ मध्ये आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोईशी त्यांनी लग्न केले. एलिझाबेथ हवामान धोरणावर काम करतात. भाजपचा आरोप आहे की पाकिस्तानमधील नियोजन आयोगाचे माजी सल्लागार अली तौकीर शेख आणि एलिझाबेथ यांचे संबंध आहेत. अली तौकीर यांनी सीडीकेएन आशियाचे संचालक म्हणूनही काम केले आहे, जे आयएसआयसाठी एक आघाडी मानले जाते.
हे ही वाचा :
आंध्र प्रदेशातील वेंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू
दहशतवादावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काय म्हणाले?
“निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर युती…” प्रशांत किशोर काय म्हणाले?
दारिद्रय निर्मूलन करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य
सरमा म्हणाले, तपासानंतर एसआयटीने आसाम मंत्रिमंडळाला आपला अहवाल सादर केला आहे. संवेदनशील माहितीमुळे तो सध्या जनतेसमोर जाहीर केला जात नाही. दरम्यान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते गौरव गोगोई यांनी हे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून लक्ष विचलित करण्यासाठी हा अजेंडा राबवला जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे.







