29 C
Mumbai
Thursday, April 15, 2021
घर राजकारण बिग बॉसच्या तयारीत गिरीश कुबेर

बिग बॉसच्या तयारीत गिरीश कुबेर

Related

लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हे कधी बाथरुममध्ये घसरून डोक्यावर पडले होते की नाही हे आम्हाला ठाऊक नाही, परतुं अलिकडे त्यांच्या लिखाणावरून त्यांच्या डोक्यावर परीणाम झाला असावा असे सारखे वाटत असते.

एल्गार परीषदेत ‘हिंदू समाज सडलेला आहे’, असे निलाजरे वक्तव्य करणारा जिहादी भामटा शर्जील उस्मानी याच्यावर नाईलाजाने का होईना पण नव सेक्युलर झालेल्या शिवसेनेनेही टीका केली, परंतु कुबेरांना मात्र त्याचा भारी कळवळा आला आहे. त्यांनी अग्रलेखात शर्जीलची जोरदार पाठराखण केली आहे. केवळ एवढेच नाहीत तर त्यांनी शर्जीलला स्वामी विवेकानंद, गोपाळ गणेश आगरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर एवढेच नाही तर आदी शंकराचार्यांच्या रांगेत नेऊन उभे केले आहे.

या सर्व दिग्गजांनी हिंदू धर्मावर टीका केली असली तरी शर्जीलच्या टीकेशी यांची तुलना एखादा मनोरुग्णच करू शकेल. हे सर्व हिंदू धर्मात जन्मलेले महात्मे होते. हिंदू धर्मात सुधारणा व्हावी, कुप्रथा गळून पडाव्यात आणि धर्म वर्धिष्णू व्हावा याच दिशेने त्यांनी आयुष्यभर काम केले. हे हिंदू धर्म सुधारक होते. त्यांना हिंदू धर्माबाबत तिळमात्र द्वेष नव्हता. ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ही भावना त्या शिवाय का स्वामी विवेकानंदांच्या तोंडून व्यक्त झाली? हिंदू धर्माच्या महान परंपरांचा रास्त अभिमान असलेली ही दिग्गज मंडळी होती.

त्यांची तुलना हिंदूंचा कमालीचा द्वेष एवढेच वैचारीक भांडवल बाळगणाऱ्या शर्जीलशी करणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण मानावे लागेल. शर्जीलने भाषणाची सुरूवातच ‘मी एक मुस्लीम तरुण म्हणून एल्गार परीषदेत बोलणार आहे’, अशी केली. मुस्लीम म्हणून तो मुस्लीम धर्मातील कुप्रथांवर बोलला नाही. त्याला मुस्लीमांमध्ये असलेल्या वैचारीक दारीद्र्याची आणि कुप्रथांची माहीती नसेल असे मानणे भाबडेपणाचे आहे. तरीही तो घसरला हिंदू समाजावर. कुबेरांना अशा हिंदू द्वेष्ट्यांचे कौतूक अशासाठी की केवळ वैचारीक दुर्गंधी पसरवणारे त्यांचे अग्रलेख मागे घेण्यासाठी हिंदू समाजाकडून त्यांच्यावर अद्यापि दबाव आलेला नाही. ख्रिस्ती समाजाच्या दबावामुळे ‘असंतांचे संत…’ हा अग्रलेख मागे घेतल्यापासून आपण किती निर्भीड आहोत हे सिद्ध करण्यासाठी ते वारंवार हिंदूंचा अपमान करतात. आज अग्रलेखातून केलेली शर्जीलची पाठराखण ही त्यात पठडीतली आहे. मुळात दुसऱ्याच्या इंग्रजी लेखांचे जसेच्या तसे अनुवाद करून स्वत:च्या नावावर छापणारे कुबेर हे पांढरपेशे शर्विलक आहेत. चोरीचा मजकूर, खोटी माहीती छापणारा हा इसम पत्रकारीतेच्या नावावर मोठा कंलक आहे. जगापेक्षा वेगळी थिअरी मांडून लोकांचे लक्ष वेधून घेऊ शकतो असा त्यांचा समज असावा.

जरा तरी लोकलाज असती तर ‘असंताचे संत…’ प्रकरणी शेपूट घालण्यापेक्षा त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन एक आदर्श घालून दिला असता. परंतु त्यावेळी लाज आणि कणा नसल्याचे सिद्ध करून ते पदाला चिकटून राहीले. त्याच वेळी त्यांची योग्यता सिद्ध झाली.

त्यांनी आपली ही योग्यता एवढी वाढवली आहे की आता ते शर्जील उस्मानीच्या पातळीवर आले आहेत. पुढच्या एल्गार परीषदेत त्यांना आयोजकांकडून मंचावर बोलवण्याची शक्यता नाकारता येत नाही. अगदीच तिथून बोलावणे आले नाही तर राखी सावंत सोबत बिग बॉसमध्ये तरी त्यांची वर्णी लागेल अशी दाट शक्यता आहे. स्वकर्तृत्वाने कुबेरांनी ही योग्यता मिळवली आहे.

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,466चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
873सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा