31 C
Mumbai
Tuesday, February 3, 2026
घरक्राईमनामासपा नेत्याच्या शेतात आढळला मुलीचा मृतदेह; मुलाला अटक

सपा नेत्याच्या शेतात आढळला मुलीचा मृतदेह; मुलाला अटक

Google News Follow

Related

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये समाजवादी पक्षाच्या एका माजी मंत्राच्या शेतात एका दलित मुलीचा मृतदेह सापडला आहे. याप्रकरणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी सपाला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. ते म्हणाले, ” उन्नावच्या दुर्दैवी बलात्कारानंतर योगीजींच्या नावाने कपाळ बडवणारे तमाम दलितांचे देशभरातील ढोंगी कैवारी आज मूग गिळून गप्प बसले आहेत.” या प्रकरणी मंत्राच्या मुलावर मुलीचे अपहरण करून खून केल्याचा आरोपखाली त्याला अटक करण्यात आले आहे.

मृतावस्थेत आढळून आलेली ही मुलगी मागील दोन महिन्यांपासून गायब होती. तिच्या आईने याबाबत ८ डिसेंबर रोजी पोलीसांत तक्रार दाखल केली होती. तिच्या कुटुंबीयांनी माजी राज्यमंत्री व समाजवादी पक्षाचे दिवंगत नेते फतेहबहादुर यांचा मुलगा राजू सिंह याच्यावर अपहरणाचे आरोप केले होते. त्यांनी अनेक पोलीस ठाण्यात खेटे घातले तरीही मुलीचा पत्ता लागला नाही. यामुले संतप्त झालेल्या मुलीच्या आईने २४ जानेवारी रोजी लखनौमध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या गाडीसमोरच उडी घेतली होती.

त्यानंतर पोलीसांनी राजू सिंह याला अटक केली. पण मुलीचा शोध लागला नव्हता. अखेर पोलिसांनी केलेल्या तपासात सिंह याच्या शेतातच मुलीचा मृतदेह पुरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शेतात खोदकाम सुरू केले आणि चार फुटांचा खड्डा खोदल्यानंतर मुलीचा मृतदेह आढळून आला.

हे ही वाचा:

आयपीएल लिलावादरम्यान ऑक्शनर ह्यू एडमिट्स कोसळले

हिजाबच्या समर्थानात काँग्रेसचे आंदोलन, पण महिला कार्यकर्त्यांचा आपसातच राडा

‘भाजपने खंजीर खुपसला, आम्ही मात्र मैत्री जपतो’

धक्कादायक! मोदीविरोधक पत्रकार राणा अय्युबने पीएम केअरला दिली देणगी

याप्रकरणी आता भाजपने समाजवादी पक्षाला धारेवर धरले आहे. भाजप खासदार अशोक वाजपेयी म्हणाले की, समाजवादी पक्षाचे नेते इतके दिवस पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र आता पोलिसांनी तपास सुरू केला असून जो दोषी असेल त्याला कठोर शिक्षा होणार.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा