26 C
Mumbai
Tuesday, November 15, 2022
घरराजकारणगुजरातच्या एकमेव राष्ट्रवादीच्या आमदाराचाही राजीनामा

गुजरातच्या एकमेव राष्ट्रवादीच्या आमदाराचाही राजीनामा

Google News Follow

Related

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून, निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसला गुजरातमध्ये धक्का बसला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीच्या एकमेव आमदाराने राजीनामा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमध्ये कंधाल जडेजा हे एकमेव आमदार होते. कंधाल जडेजा यांना राष्ट्रवादीने पोरबंदरमधील कुटियाना इथे उमेदवारी देण्यास नकार दिला. यामुळे नाराज होऊन जडेजा यांनी राजीनामा दिल्याचे म्हटले जातं आहे.
कंधाल हे गेल्या २०१२ पासून कुटियाना मतदारसंघातून विधानसभेत निवडून आले आहेत. कंधाल जडेजा यांनी ११ नोव्हेंबर रोजी कुटियाना मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर त्याच दिवशी राष्ट्रवादीने काँग्रेससोबत उमरेठ, नरोडा आणि देवगड बारिया या तीन ठिकाणी आघाडी केल्याची घोषणा केली होती.

कंधाल जडेजा यांनी पक्षादेश झुगारून राज्यसभा निवडणूक आणि राष्ट्रपती निवडणुकीवेळी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. पक्षविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेवत कंधाल जडेजा यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र जडेजा यांनी आपण नाराज होऊन राजीनामा दिल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा :

लव्ह जिहादची शिकार ठरलेल्या मुंबईतल्या श्रद्धाचे त्याने केले ३५ तुकडे

डोंबिवलीतल्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांत होत्या तीन महिला, सुखरूप सुटका

आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६१ किलो सोन्याची जप्ती

आयसीसीच्या सर्वोत्तम संघात टीम इंडियाची बाजी

दरम्यान, गुजरात विधानसभेसाठी दोन टप्प्यात मदतान होणार असून पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. तर मतमोजणी ८ डिसेंबरला होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,961चाहतेआवड दर्शवा
1,972अनुयायीअनुकरण करा
51,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा