29 C
Mumbai
Tuesday, November 15, 2022
घरक्राईमनामाहत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती

हत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती

श्रद्धाला तिच्या जिवाला धोका असल्याचा अंदाज पूर्वीच आला होता

Google News Follow

Related

हत्येपूर्वी श्रद्धाने दिली होती मित्राला हत्येची माहिती दिल्लीमध्ये एका तरुणीची तिच्या प्रियकराने निघ्रृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार हत्याकांडाच्या सहा महिन्यानंतर उघडकीस आला. हत्या केल्यानंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे ३५ तुकडे त्याने केले आणि ते तुकडे जंगलात टाकले. आता या हत्याकांडासंदर्भात आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे. श्रद्धाला तिच्या जिवाला धोका असल्याचा अंदाज पूर्वीच आला होता असं तिच्या मित्राने दिलेल्या माहितीवरुन स्पष्ट होतं आहे.

श्रद्धाचा मित्र लक्ष्मण याने ही माहिती दिली आहे. श्रद्धा आणि आफताबमध्ये अनेकदा वाद होतं असत. एकदा श्रद्धाने व्हॉट्सअपवर माझ्याशी संपर्क साधला होता आणि आफताबपासून सुटका करं अशी मागणी केली होती. त्यावेळेस तिने मी याच्याबरोबर आज रात्री थांबले तर तो मला मारुन टाकेल, असं तिने म्हटलं होत, अशी माहिती लक्ष्मणने दिली आहे.

श्रद्धाच्या या मेसेजनंतर लक्ष्मण त्याच्या काही मित्रांबरोबर श्रद्धाच्या छत्रापूर येथील घरी गेला. त्यांनी श्रद्धाला आफताबविरोधात तक्रार करण्यासाठी पोलिसांत जाण्याचा सल्ला दिला. मात्र श्रद्धाने आफताबविरोधात पोलीसांमध्ये जाण्यासंदर्भात सहमती न दर्शवल्याने आम्हीही हे प्रकरण पोलीसांत नेलं नाही, असं लक्ष्मण म्हणाला. मात्र, मागील काही महिन्यांपासून श्रद्धाने संपर्क करणं बंद केल्याने तिची चिंता वाटत होती असं लक्ष्मणने सांगितलं. मी तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू लागलो. पण अनेक दिवस प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. अखेर मला फार चिंता वाटू लागली. मी तिच्या आणि माझ्या ओळखीतल्या काही मित्रांकडेसुद्धा चौकशी करण्यास सुरुवात केली. मात्र तिची कोणतीही माहिती मिळत नसल्याने मी तिच्या भावाला याबद्दलची कल्पना दिली. मागील काही महिन्यांपासून तिच्याशी संपर्क झालेला नाही. आपण पोलिसांची मदत घेतली पाहिजे, असं तिच्या भावा कळवलं.

हेही वाचा :

गुजरातच्या एकमेव राष्ट्रवादीच्या आमदाराचाही राजीनामा

लव्ह जिहादची शिकार ठरलेल्या मुंबईतल्या श्रद्धाचे त्याने केले ३५ तुकडे

डोंबिवलीतल्या मुलाचे अपहरण करणाऱ्यांत होत्या तीन महिला, सुखरूप सुटका

आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६१ किलो सोन्याची जप्ती

लक्ष्मणकडून माहिती मिळाल्यानंतर श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबरला तक्रार दाखल केली. पुढे मग हा प्रकार उघडकीस आला. माणिकपूर पोलिसांच्या तांत्रिक तपासात श्रद्धाचा फोन मे पासूनच बंद असल्याचे आढळले. याबाबत पोलिसांनी आफताब पुनावाला याला चौकशीसाठी बोलावले होते. ती भांडण करून घरातून निघून गेली, पण कुठे गेली ते मला माहीत नाही, असे उत्तर त्याने पोलिसांना दिले. परंतु पोलिसांना त्याच्या बोलण्याची शंका आली. पोलिसांनी दिल्लीत जाऊन पडताळणी केली आणि त्यांचा संशय बळावला. दिल्ली पोलिसांच्या मदतीने माणिकपूर पोलिसांनी आफताबची कसून चौकशी केली असता श्रद्धाच्या हत्येचा गुन्हा उजेडात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,961चाहतेआवड दर्शवा
1,972अनुयायीअनुकरण करा
51,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा