26 C
Mumbai
Saturday, March 25, 2023
घरधर्म संस्कृतीजगद्गुरू रामभद्राचार्य यांनी पंतप्रधानपदाबद्दल केली ही भविष्यवाणी

जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी पंतप्रधानपदाबद्दल केली ही भविष्यवाणी

गोहत्या बंद करायची आहे आणि हिंदीला राष्ट्रभाषा बनवायची आहे

Google News Follow

Related

जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी पंतप्रधान मोदींबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी २०२४ मध्ये मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असे भाकीत केले आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या गुरूने मोदी सरकारमध्ये कोणती मोठी कामे करायची आहेत हेही सांगितले.

जगद्गुरु रामभद्राचार्य यांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्ही कोणतीही कसर सोडली नाही, माझ्यावर लाठीचार्ज केला, माझा जीव वाचला असे म्हणताना ऐकू येत आहे. किमान भाजपने मला पद्मविभूषण देऊन माझ्या योग्यतेचा आदर तरी केला. माझ्या शब्दाचे पालन करून राम मंदिर बांधले गेले. समजून घ्या मी पुन्हा भविष्यवाणी करत आहे. पंतप्रधान मोदी तिसऱ्यांदाही येणार आहेत आणि यावेळीही अनेक मोठी कामे करायची आहेत. गोहत्या बंद करायची आहे आणि हिंदीला राष्ट्रभाषा बनवायची आहे असे जगद्गुरु रामभद्राचार्य व्हिडिओमध्ये सांगत आहेत .

हे ही वाचा:

अमेरिकेने फोडला चीनचा फुगा; चीनने व्यक्त केला संताप

श्रीराम आणि सीतामाईना मूर्त स्वरूप देणारे मराठमोळे हात

पुणेकर लवकरच घेणार डबलडेकर प्रवासाचा आनंद

आशियातला पहिला हेलिकॉप्टर कारखाना बनवण्याचा बहुमान भारताला

रामचरितमानसवर बंदी घालण्याचे समर्थन करणारे नेते स्वामी प्रसाद मौर्य. याशिवाय बिहारचे शिक्षणमंत्री चंद्रशेखर हे देखील आहेत. मी तुम्हाला खुले आव्हान देत आहे माझ्यासमोर या. माझ्यासमोर येऊन माझ्याशी चर्चा करा. कोणत्या पानावर तुमचा आक्षेप आहे त्याचे समाधान मी करेन, असेही जगद्गुरु रामभद्राचार्य व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

बागेश्वर धामचे महंत गुरु रामभद्राचार्य यांनी आपल्या शिष्याचे समर्थन करताना सांगितले की, धीरेंद्र शास्त्री यांची लोकप्रियता लोकांना पचनी पडत नाही, त्यामुळेच संभ्रम पसरवला जात आहे. हळूहळू सर्व काही शांत होईल आणि धीरेंद्र शास्त्री समाजात उठतील. जगद्गुरु रामभद्राचार्य म्हणाले, “ते आपल्या गुरु आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचा प्रसाद वाटप करत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,880चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा