28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
घरराजकारणऑपरेशन अजयमुळे इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले

ऑपरेशन अजयमुळे इस्रायलमधून २१२ भारतीय मायदेशी परतले

या विमानात लहान मुलांसह एकूण २११ प्रवासी होते

Google News Follow

Related

‘ऑपरेशन अजय’अंतर्गत युद्धग्रस्त इस्रायलमधून २१२ भारतीयांना घेऊन निघालेले पहिले चार्टर विमान शुक्रवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले. केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यावेळी त्यांच्या स्वागताला उपस्थित होते.

 

‘ऑपरेशन अजय’अंतर्गत ज्या भारतीय प्रवाशांना इस्रायलमधून भारतात परतण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी विशेष विमानाची सोय करण्यात आली होती. त्या दृष्टीने गुरुवारी सकाळी इस्रायलची राजधानी तेल अविव येथील बेन गुरियन विमानतळावरून पहिले विमान दिल्लीसाठी निघाले होते. या विमानात लहान मुलांसह एकूण २११ प्रवासी होते.

 

शनिवार सकाळपासूनच गाझा पट्टीवरून हमास दहशतवाद्यांकडून इस्रायलवर हल्ले होत आहेत. त्यामुळे इस्रायलनेही प्रत्युत्तरादाखल हल्ले करण्यास सुरुवात केली असून हे युद्ध असल्याचे जाहीर केले आहे. या युद्धात आतापर्यंत अडीच हजार जणांना जीव गमवावा लागला आहे. इस्रायलनेही हमासच्या हल्ल्यांविरोधात तीव्र प्रतिकार मोहीम उघडली आहे. या पार्श्वभूमीवर इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप भारतात आणण्यासाठी ‘ऑपरेशन अजय’मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 

७ ऑक्टोबर रोजी युद्धाला तोंड फुटताच एअर इंडिया विमान कंपनीने त्याच दिवसापासून आपली इस्रायलला जाणारी आणि तेथून येणारी सर्व विमाने रद्द केली होती. ही सेवा अद्यापही बंदच आहे. त्यामुळे अनेक भारतीय इच्छा असूनही भारतात परतू शकत नव्हते. त्यामुळे ‘ऑपरेशन अजय’अंतर्गत केंद्र सरकारने बुधवारीच त्यांच्यासाठी खास विमानाची सोय करण्यात येईल, असे जाहीर केले. स्थानिक वेळेनुसार, गुरुवारी रात्री १० वाजून १४ मिनिटांनी पहिल्या विमानाने उड्डाण केले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही ‘एक्स’ या व्यासपीठाच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

हे ही वाचा:

नीरज चोप्राला ‘वर्ल्ड ऍथलिट ऑफ दी इअर’ पुरस्कारासाठी नामांकन

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

शाळेजवळ सुरू असणारे ७ कुंटणखाने बंद, ३३ महिलांची सुटका

इस्रायलच्या लष्कराने हमासच्या ताब्यातून केली २५० ओलिसांची सुटका

पहिले विशेष विमान उड्डाणासाठी तयार असतानाच विद्यार्थ्यांसह शेडको भारतीयांनी विमानात चढण्यासाठी गर्दी केली होती. दुतावासाकडून याआधीच शुक्रवारी दुसरे विमान निघणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. ‘पहिले येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार विमानात प्रवेश दिला जाणार आहे. इस्रायलमधील बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळ इस्रायलमधील मुख्य विमानतळ आहे. तो लोड शहराच्या बाहेर स्थित आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
167,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा