27.1 C
Mumbai
Thursday, July 23, 2026
घरराजकारणजंतर-मंतरवर राजकारण, नीट देणारे खरे विद्यार्थी मात्र अभ्यासात!

जंतर-मंतरवर राजकारण, नीट देणारे खरे विद्यार्थी मात्र अभ्यासात!

सरकारने आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले नव्हते!

Google News Follow

Related

सोमवारी, काँक्रोच जनता पार्टीने दिल्लीत मोठ्या मार्चचे नियोजन केले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. सरकारने लाठीचार्ज केला. NEET परीक्षा आणि पेपर लीक प्रकरणावरून रस्त्यापासून संसदेपर्यंत जोरदार गदारोळ सुरू असताना, केंद्र सरकारमध्ये काल दिवसभर उच्चस्तरीय बैठकांचे सत्र पार पडले. आंदोलनाच्या दीर्घ कालावधीनंतर ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली खरी, पण सरकारने स्पष्ट केले आहे की ही बैठक आंदोलकांच्याच विनंतीवरून झाली होती. एका वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार, “सरकारने आंदोलकांना चर्चेसाठी बोलावले नव्हते आणि त्यांना कोणतेही आश्वासन दिलेले नाही.”

हे ही वाचा:

विराट कोहलीच्या एका सल्ल्याने बदलले पी. व्ही. सिंधूचे आयुष्य

सरकार उलथवण्याचाच आहे डाव !

आधी दहशतवाद थांबवा, मगच सिंधू करार!

स्पेनचा विश्वविजय!

आंदोलनात आम आदमी पार्टीने गर्दी जमवल्यामुळे काँग्रेसने अंतर ठेवल्याची चर्चा रंगली असून विरोधी पक्षांमधील या मतभेदांमुळे आंदोलन शांत होईल, असा सरकारचा अंदाज आहे. केंद्रीय बैठकीनंतर एका वरिष्ठ मंत्र्याने नाव न छापण्याच्या अटीवर मोठे विधान केले. ते म्हणाले, “जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनात बहुतांश राजकीय कार्यकर्तेच आहेत. प्रत्यक्ष नीट देणारे खरे विद्यार्थी आता पुढील स्पर्धा परीक्षांच्या तयारीला लागले आहेत.”

तर दुसरीकडे आज पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली असून अभिजित दिपके पुन्हा जंतर मंतरवर गेला आहे. तसेच रात्रभर आंदोलक आणि विद्यार्थी रस्त्यांवर बसून होते, ते पुन्हा संसद मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. यामुळे आजचा दिवस देखील लाठ्याकाठ्या आणि आंदोलनाचा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
321,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा