32 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरराजकारणअंतर्वस्त्रात रेल भ्रमंती! आमदार साहेब...हे वागणं बरं नव्हं

अंतर्वस्त्रात रेल भ्रमंती! आमदार साहेब…हे वागणं बरं नव्हं

Google News Follow

Related

जनता दल युनायटेड पक्षाचे आमदार गोपाल मंडल हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. गोपाल मंडल यांनी असे काही कृत्य केले आहे की माध्यमे आणि समाज माध्यमांवर सध्या त्यांची चर्चा रंगली आहे. रेल्वे मधून दिल्ली येथे जात असताना गोपाल मंडल रेल्वे डब्यात चक्क अंतर्वस्त्रांवर वावरताना आढळून आले.

पटना दिल्ली तेजस राजधानी गाडीत हा प्रकार घडला. गोपाळ मंडल हे या गाडीने प्रवास करत होते. पण या गाडीत त्यांच्या या असभ्य वर्तनाचा प्रत्यय आला. त्यांच्या या वर्तनाने रेल्वे डब्यात उपस्थित सर्वांनाच धक्का बसला. या डब्यातील इतर प्रवाशांसाठी ही परिस्थिती खूपच विचित्र झाली होती.

गोपाल मंडल यांना त्यांच्या वागण्यावरून त्यांना समजावण्याचा सहप्रवाशांनी प्रयत्न केला. त्यांनी असे अंतर्वस्त्रावर न फिरता कपडे घालावेत यासाठी त्यांना विनंती करण्यात आली. पण आपल्या मुजोरीत वावरणाऱ्या आमदार गोपाल मंडल यांनी कोणाचेच ऐकले नाही. उलट त्यांनी सहप्रवाशांची हुज्जत घातली. त्यांना शिवीगाळ केली.

हे ही वाचा:

बजबजपुरी! मुंबईतील खड्डे बुजता बुजेना

पॅरालिम्पिक २०२०: प्रवीण कुमारने विक्रमी कामगिरी करत पटकावले रौप्य पदक

रोनाल्डोचे विश्वविक्रमी ‘गोल’ साध्य!

रशियाच्या ‘झापड’ मध्ये भारताचा सहभाग

हे प्रकरण इतके चिघळले की या वादावादीमुळे रेल्वे पोलीस तिथे हजर झाले. ह रेल्वे पोलिसांसाठीही हे सारेच प्रकरण खूप विचित्र होऊन बसले होते. पोलिसांनी आपल्या परीने रेल्वेतील नागरिकांना शांत केले. तर त्यासोबतच आमदार गोपाल मंडल यांना देखील समजवण्याचा प्रयत्न केला. पण आमदार गोपाल मंडल यांनी पोलिसांचेसुद्धा ऐकले नाही.

नेताजींचा हा अंतर्वस्त्रांमधील फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आणि त्यांच्यावर टीकादेखील होऊ लागली. पुढे माध्यमांनीही ही बातमी लगेच उचलली. यानंतर गोपाल मंडल यांनी आपल्या कृतीबद्दल दिलगिरी व्यक्त करायची सोडून त्यांनी आपल्या कृतीचे लंगडे समर्थन करायचा प्रयत्न केला. आपले पोट खराब असल्यामुळे आपण असे वावरत असल्याचे आमदार मंडल यांनी सांगितले. पण तरिही त्यांच्या या वर्तनाचे समर्थन होऊच शकत नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा