29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
घरराजकारण‘अमलीपदार्थांच्या संकटाशी लढण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध'

‘अमलीपदार्थांच्या संकटाशी लढण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध’

Google News Follow

Related

क्रूझ ड्रग्स प्रकरणाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मणिपूरच्या इम्फाळ येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, ‘केंद्र सरकार अमलीपदार्थांच्या (ड्रग्स) संकटाशी लढण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.’ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना मुंबईत क्रूझवर अटक करण्यात आली. त्याच वेळी, या प्रकरणात, महाराष्ट्र सरकारमधील एका मंत्र्याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (एनसीबी) अनेक आरोप केले आहेत, परंतु एनसीबीने ते सर्व आरोप फेटाळून त्यांना निराधार आणि खोटे ठरवले आहे.

भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, ‘ड्र्ग्सविरोधातील निश्चित कारवाईसाठी आपल्याला हे पाहावे लागेल की समाज ड्रग्सविरूद्धच्या लढाईत सक्षमपणे सहभागी होण्याच्या स्थितीत आहे.’ नड्डा म्हणाले, ‘भाजप ड्रग्सच्या गैरवर्तनाशी लढण्यासाठी कटिबद्ध आणि वचनबद्ध आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की, या मुद्द्यावर मोदी सरकार पुढाकार घेईल. एनसीबीने अलीकडेच क्रूझवरील ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केला होता त्यानंतरच जेपी नड्डा यांनी ड्रग्जच्या विरोधात हे वक्तव्य केले आहे.

हे ही वाचा:

आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला

…म्हणून भारत-चीन चर्चेची १३वी फेरी ठरली अपयशी!

‘काकांचं दुःख सतावत असल्यामुळेच बंदचा कांगावा’

‘राष्ट्रीय सुरक्षेसाठी अंतराळ क्षेत्रात खासगी गुंतवणूक हवी’

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानही या प्रकरणात अडकला आहे. आर्यन खान रेव्ह पार्टीमध्ये अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्यासह क्रूझवर उपस्थित होता. यामुळे एनसीबीने त्याला ताब्यात घेतले आणि नंतर अटक केली.

यापूर्वी सप्टेंबरमध्ये एनसीबीला मोठे यश मिळाले होते. एनसीबीच्या कारवाईत मुंद्रा बंदरातून मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ जप्त करण्यात आले. १३ सप्टेंबर रोजी एनसीबीने २१ हजार कोटी रुपये किमतीचे २,९८८.२१ किलो हेरॉईन जप्त केले होते. या प्रकरणामध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही सहभाग असल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.

क्रूझ पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या शाहरुखच्या मुलाला सोमवारीही न्यायालयाकडून दिलासा मिळाला नाही. आर्यन खान सध्या आर्थर जेलमध्ये आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा