30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरराजकारणकारुळकर प्रतिष्ठानतर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा सत्कार

कारुळकर प्रतिष्ठानतर्फे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा सत्कार

Google News Follow

Related

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फ्रान्समधील समुद्रात मारलेली ऐतिहासिक उडी आजही प्रेरणादायी ठरते. ८ जुलै १९१० रोजी वीर सावरकरांनी ही उडी मारून इंग्रजांना चकवा दिला होता. त्याला ८ जुलै २०२२ला ११२ वर्षे झाली. त्यानिमित्ताने मुंबईतील स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकात वीर सावरकरांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते हे अनावरण पार पडले. सुप्रसिद्ध चित्रकार सुहास बहुळकर यांनी हे चित्र साकारले आहे. यानिमित्ताने कारुळकर प्रतिष्ठानच्या वतीने नार्वेकर यांना सन्मानित करण्यात आले. ‘न्यूज डंका’ने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेला दिवाळी विशेषांक भेट देऊन नार्वेकर यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर यांनी नार्वेकर यांना दिवाळी अंक प्रदान केला. यावेळी ‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी हेदेखील उपस्थित होते.

हे ही वाचा:

जपानच्या माजी पंतप्रधान शिंजो आबेंच्या मृत्यूनंतर, राष्ट्राध्यक्षांच्या हत्या पुन्हा चर्चेत

वीर सावरकरांची शौर्यगाथा सांगणारे संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारणार!

बँक घोटाळाप्रकरणी सीबीआयच्या छापेमारीत मिळाली ४० कोटींची चित्रे आणि शिल्पकृती

बीकेसीजवळच्या एका झोपडीत सापडला नागोबा!

 

नार्वेकर यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे एक संग्रहालय दक्षिण मुंबईत असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे अवघे आयुष्य हे प्रखर राष्ट्रभक्तीचे धगधगते अग्निकुंड आहे. त्यांच्यासारखा वीरपुरुष शतकातून एकदाच जन्माला येतो. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रकार्याची माहिती देणारे संग्रहालय दक्षिण मुंबईत उभारावे, यासाठी येत्या अधिवेशनात आग्रह धरणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शुक्रवारी केली.

भारताचा स्वातंत्र्यलढा जगाच्या पटलावर आला. त्यामुळे मार्साय बंदरात वीर सावरकरांचे स्मारक उभारण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी स्वातंत्र्यवीर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा