33 C
Mumbai
Sunday, December 7, 2025
घरराजकारण‘दाऊदसोबत विमानात कोण बसले होते, हे शरद पवारांनी सांगावे’

‘दाऊदसोबत विमानात कोण बसले होते, हे शरद पवारांनी सांगावे’

Google News Follow

Related

किरीट सोमैय्या यांचा खळबळजनक सवाल

गेले १३ दिवस नुसतं नाटक चाललं आहे. नवाब मलिक सकाळी उठतात आणि मीडियाला बाईट देतात, पत्रकार परिषद घेतात, काय चाललंय काय? समीर वानखेडे हिंदू नाही, मुस्लिम आहे. दलित नाही, मुस्लिम आहे. क्रांती रेडकरचे लग्न हिंदू पद्धतीने झाले पण नवऱ्याचे लग्न मुस्लिम पद्धतीने झाले. समीर वानखेडे तुमचे वडील ज्ञानदेव नाहीत, दाऊद आहेत, असेच रोज आरोप केले जात आहेत. पण ठाकरे सरकारचा जो बाप आहे, त्या शरद पवारांना विचारा की, १९९३-९४ला दाऊदसोबत कोण विमानात बसलं होतं. शरद पवार विसरले का ते, अशा शब्दांत माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी सध्याच्या नवाब मलिक-वानखेडे प्रकरणाचा आधार घेत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सोमैय्या यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले.

सोमैय्या म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे यांना घोटाळेबाजांना वाचविण्यासाठी लक्ष विचलित करायचे होते. त्यामुळेच रोज उठून त्यांचा मंत्री वानखेडे परिवाराचा अपमान करतो, हिंदुंचा अपमान करतो, दलितांचा अपमान करतो. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही.

सोमैय्या पुढे म्हणतात की, अधिकाऱ्याची जर चूक झाली तर तक्रार करा. पण त्यांची टरकली आहे. त्यामुळेच आरोप करणारे पंच समोर येत नाहीत. एनसीबीने त्यांना बोलावणे पाठवले, पण ते एनसीबीसमोर आलेच नाहीत. २५ कोटींचा आरोप करणारा साईल एनसीबीसमोर उपस्थित झालेला नाही. याच आरोपाचा उल्लेख (आर्यन खानची न्यायालयात सुनावणी सुरू असताना) न्यायालयात का केला गेला नाही? त्यावरून दाऊद किसका बाप है अवघ्या महाराष्ट्राला कळले.

 

हे ही वाचा:

जो जितेगा वही सिकंदर

‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ कारण या पिक्चरमध्ये अजून मी आलो नाहीये’

‘कुणाचा नवरा हिंदू की मु्स्लिम याचे नवाब मलिक आणि मीडियाला काय देणेघेणे?’

गाणाऱ्या व्हायोलिनचे सूर हरपले; प्रभाकर जोग कालवश

 

सोमैय्या हे दिवाळीनंतर पुन्हा एकदा काही घोटाळे बाहेर काढणार आहेत. ते म्हणाले की, दिवाळीत फटाके वाजवले जातात, पण मी दिवाळीनंतर फटाके फोडणार आहे. एक नाही, दोन नाही तर अर्धा डझन लोकांचे फटाके फुटणार आहेत. हे घोटाळेबाज सरकार आहे. गेले १३ दिवस नौटंकी झाली. तीन मंत्री आणि तीन जावयांचे घोटाळे मी बाहेर काढणार आहे. अजित पवार, हसन मुश्रीफ, नवाब मलिक यांनी आपापल्या जावयांना खुश केले. असे अर्धा डझन ऍटमबॉम्ब फोडण्याचं काम मी करणार आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा