27 C
Mumbai
Wednesday, March 22, 2023
घरक्राईमनामालिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आणि ठणठणीत ? तामिळ नेत्याच्या दाव्याने...

लिट्टे प्रमुख प्रभाकरन जिवंत आणि ठणठणीत ? तामिळ नेत्याच्या दाव्याने खळबळ

Google News Follow

Related

तब्बल तीन दशके आपल्या दहशतवादी कारवायांनी सगळ्यांना भंडावून सोडणारा श्रीलंकेतील तमिळ बंडखोरांचा नेता आणि एलटीटीई म्हणजेच तमिळ लिबरेशन टायगर ईलमचा नेता व्ही. प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आलाय. तामिळनाडूचे माजी काँग्रेस नेते आणि तमिळच्या जागतिक महासंघाचे अध्यक्ष पाझा नेदुमारन यांनी हा दावा केला आहे. प्रभाकरन जिवंत आणि सुखरूप असून लवकरच जगासमोर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नेदुमारन यांच्या दाव्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या श्रीपेरांबुद्दूर येथे झालेल्या भीषण हत्येत त्याचा सहभाग होता.

श्रीलंका सरकारने प्रभाकरनला १८ मे २००९ रोजी मृत घोषित केले होते. श्रीलंकन ​​सैनिकासोबत झालेल्या चकमकीत तो ठार झाल्याचा दावा सरकारने केला होता . जेव्हा सैनिकांनी त्याला चारही बाजूंनी घेरले तेव्हा त्याने स्वतःवर गोळी झाडली. प्रभाकरनच्या मृत्यूचा दावा केल्यावर २१ मे रोजी श्रीलंकेचा जाफना प्रदेश एलटीटीईच्या दहशतीतून मुक्त झाला होता. मात्र, आता पुन्हा एकदा प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा केला जात आहे.

प्रभाकरन यांच्या मृत्यूबाबत विविध माध्यमांतून वेगवेगळ्या बातम्या येत असतात. सैनिकांनी घेरले असताना प्रभाकरनने स्वत:वर गोळी झाडली असे काहींचे म्हणणे आहे, तर त्याला सैनिकांनी गोळ्या घातल्या असाही एकही मतप्रवाह आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप प्रभाकरनवर आहे. याशिवाय, श्रीलंकेच्या दुसर्‍या राष्ट्राध्यक्षांच्या हत्येचा प्रयत्न, शेकडो राजकीय हत्या आणि पंचवीस आत्मघाती हल्ले यासाठी तो जबाबदार आहे. श्रीपेरांबुद्दूरमध्ये ही हत्या होण्यापूर्वीही एकदा प्रभाकरनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या हत्येनंतर अचानक लिट्टेकडून प्रभाकरन जिवंत असल्याचा दावा करण्यात आला होता.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

तमिळ बंडखोरांचा नायनाट करण्यासाठी जाफना आणि उत्तर श्रीलंकेत केलेल्या लढाईत लिट्टे सह त्याचा प्रमुख व्ही प्रभाकरन मारला गेल्याचं श्रीलंकन लष्कराने जाहीर करण्यात आलं होतं. आता माजी काँग्रेस नेते नेदुमारन यांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

कोण आहे वेलुपिल्लई प्रभाकरन?
वेलुपिल्लई प्रभाकरन हा लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमचा संस्थापक होता एलटीटीईला दहशतवादी संघटना म्हटले जाते.लिट्टेने श्रीलंकेच्या उत्तर आणि पूर्वेला स्वतंत्र तमिळ राज्य निर्माण करण्याची मागणी केली होती . ए लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमने जवळपास तीन दशके आपल्या दहशतीने लोकांना घाबरवले होते. त्यानंतर २०९ मध्ये श्रीलंका सरकार आणि लष्कराने एलटीटीई प्रमुख प्रभाकरनची हत्या केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,882चाहतेआवड दर्शवा
2,026अनुयायीअनुकरण करा
65,200सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा