29 C
Mumbai
Friday, December 5, 2025
घरधर्म संस्कृतीहिंदुंच्या मिरवणुका, उत्सवाला विरोध करणाऱ्या मुस्लिमांवर मद्रास हायकोर्टाचे ताशेरे

हिंदुंच्या मिरवणुका, उत्सवाला विरोध करणाऱ्या मुस्लिमांवर मद्रास हायकोर्टाचे ताशेरे

Google News Follow

Related

केवळ मुस्लिमबहुल भाग आहे म्हणून तेथील हिंदुंच्या परंपरागत मिरवणुका, उत्सव यावर बंदी घालण्याचा संतापजनक प्रकार तामिळनाडूतील पेरम्बुलुर जिल्ह्यातील कलाथूर येथे घडला आहे. मूर्तिपूजा करणे आमच्यासाठी निषेधार्ह आहे. आम्ही त्याला प्रोत्साहन देणार नाही. त्यामुळे येथे हिंदुंच्या मिरवणुका, उत्सव आयोजित करू दिले जाणार नाही, असे या भागातील मुस्लिमांनी केलेल्या याचिकेवरून मद्रास उच्च न्यायालयाने त्यांना खडसावले.

न्या. एन. किरुबाकरन आणि न्या. वेलमुरुगन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला असून त्यांनी मिरवणुका, उत्सव या मूलभूत अधिकारांना कुणीही विरोध करू शकत नाही. भारत एक धर्मनिरपेक्ष देश आहे, असे स्पष्ट शब्दांत ताशेरे ओढत न्यायालयाने मुस्लिमांची ती याचिका फेटाळून लावली.

हे ही वाचा:

आधी उत्तर प्रदेशबद्दल बोला, गुजरातबद्दल बोला

अजितदादांच्या मनात बहुजनांविषयी आकस

डीआरडीओचे कोरोनावरील औषध आता रुग्णांसाठी उपलब्ध

तौक्तेचा तांडव: जळगावमध्ये झाड पडून दोन मुलींचा मृत्यू, आई गंभीर जखमी

मुस्लिम बहुल भागात हिंदू सणांवर बंदी घालावी अशी मागणी या गावातील कट्टरपंथी मुस्लिमांनी न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, स्वातंत्र्यानंतर जर हिंदूंनी तुमच्याप्रमाणे विचार केला तर तुमची परिस्थिती काय झाली असती, याचा विचार केला आहे काय?

या गावात २०१२च्या आधी सर्व मिरवणुका, उत्सव साजरे होत होते. पण नंतर हिंदूंच्या मिरवणुका, उत्सव यांना विरोध होऊ लागला. इस्लामी कट्टरपंथींनी हिंदुंच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला. त्यावर न्यायालयाने म्हटले आहे की, केवळ एका धार्मिक गटाचे वर्चस्व आहे म्हणून तिथे अन्य धर्मियांच्या मिरवणुकांना प्रतिबंध करणे उचित नाही. धार्मिक असहिष्णुतेस थारा दिला जात असेल तर ते भारतासारख्या देशासाठी अजिबात योग्य नाही.

असे निर्बंध घालून सदर मुस्लिम वर्ग आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असल्याचेही न्यायालयाने नमूद केले आहे.

यासंदर्भात भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भातखळकर यांनी ट्विट केले आहे की, मुस्लिमबहुल भाग पाकिस्तान आहे की सौदी? हिंदुंना त्यांच्या मातीत ईश्वर पूजा करण्यास प्रतिबंध करण्यासाठी न्यायालयात गेलेल्या मुस्लिमांना मद्रास हायकोर्टाने कानशिलात लगावली. कायद्याने झाले ते चांगलेच…

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा