32 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
घरविशेषतौक्तेचा तांडव: जळगावमध्ये झाड पडून दोन मुलींचा मृत्यू, आई गंभीर जखमी

तौक्तेचा तांडव: जळगावमध्ये झाड पडून दोन मुलींचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Google News Follow

Related

कर्नाटक आणि गोव्यानंतर तौक्ते चाकरी वादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसू लागला आहे. ह्या चक्रीवादळाच्या परिणामाने जळगावमध्ये झाड पडल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या झाडाखाली चिरडून दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाला असून त्यांची आई गंभीर जखमी झाली आहे. या दोन्ही मुलींची वय १७ आणि १२ वर्षे होते. जळगावमधील आंचलवाडी परिसरात ही घटना घडली.

तौक्ते चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. पण जाता जाता महाराष्ट्रालाही त्याचा तडाखा बसताना दिसत आहे. महाराष्ट्रात रविवारी दिवसभरात अनेक ठिकाणी वादळीवार आणि पाऊस बघितला गेला. त्यातच जळगावमधून जीवितहानी झाल्याचीही नोंद करण्यात आली आहे. तौक्ते चक्रीवादळ सध्या १९ किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गुजरातकडे सरकत असल्याची नोंद करण्यात आली आहे. गुजरात किनारपट्टीत पोरबंदर आणि भावनगर जिल्ह्याच्या मध्ये हे वादळ १८ तारखेला पहाटे पोहोचणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. गुजरातमधील १४ जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

तौक्ते वादळाचा कर्नाटक,गोव्याला तडाखा… गुजरात अलर्टवर

सोमवारीही मुंबईत लसीकरण बंद

तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना भाजपा देणार मदतीचा हात

ठाकरे सरकारने मराठा आरक्षणाचा मुडदा पाडला

दरम्यान महाराष्ट्रासोबतच कर्नाटक आणि गोव्यातही या चक्रीवादळामुळे मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी ४ मृत्यू कर्नाटकमध्ये झाले आहेत तर २ मृत्यू गोव्यात नोंदवले गेले आहेत. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमधील कोवीड लसीकरण सोमवार, १७ मे रोजी बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. आयएमडी अर्थात इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने तीव्र अशा तौक्ते चक्रीवादळाच्या दिलेल्या इशाऱ्यामुळे बीएमसीने हा निर्णय घेतला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा